रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेत पदभार स्वीकारला संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा रंगला होता. या सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप, काँग्रेस आणि इतर अनेक पक्षाचे खासदार, नेते, मंत्री यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात घडलेला एक प्रसंग मात्र सगळ्यांच्या स्मरणात राहिला आहे. तो होता राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोरासमोर आले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींसोबत हात मिळवला आणि विचारलं ‘कसे आहात राहुलजी?’ यानंतर राहुल गांधी यांनी दोन्ही हात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मिळवत आणि स्मित हास्य करत उत्तर दिलं ‘सर मी ठीक आहे’राष्ट्रपतीपदाच्या शपथविधी सोहळ्यात हा प्रसंग अत्यंत लक्षवेधी ठरला.

रामनाथ कोविंद यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहचले होते, रामनाथ कोविंद आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी नरेंद्र मोदी निघाले यावेळी कॉरिडॉरमध्ये त्यांना राहुल गांधी दिसले.. योगायोग म्हणजे हे दोन्ही नेते एकदमच समोर आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींसोबत हात मिळवला आणि कसे आहात असंही विचारलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही पंतप्रधान भेटले आणि त्यांचंही सोहळ्याला स्वागत केलं. मात्र खास लक्षवेधी ठरली ती राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटच!

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर हे दोन्ही नेते पंतप्रधानपदाचे दावेदार होते. काँग्रेसनं या निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालीच लढल्या. ज्यानंतर काय घडलं ते आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

लोकसभेतली अधिवेशनं असोत, जाहीर कार्यक्रम असोत किंवा ट्विटरसारखा सोशल मीडिया राहुल गांधी कायमच मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. त्यामुळे आज राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीसोहळ्यासाठी हे नेते जेव्हा समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात झाले छोटासा संवाद आणि हातमिळवणी स्मरणात राहण्यासाऱखीच ठरली.