21 January 2019

News Flash

जगातील तीन अव्वल नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश

एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातील निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : जगातील अव्वल (टॉप) तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. Gallup International या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. आगामी दावोस परिषदेसाठी स्विर्त्झलंड दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यामुळे छाप पडणार आहे.


Gallup International च्या दाव्यानुसार, सर्वेक्षणात मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जगातील ५० देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चांसलर अंजेला मार्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन तर तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागला आहे.

चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना मागे टाकून मोदींनी हे स्थान राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ आणि २३ जानेवारीला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस परिषदेसाठी दोन दिवसांसाठी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

First Published on January 12, 2018 12:24 pm

Web Title: pm modi ranked among top 3 world leaders in survey