26 February 2021

News Flash

पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ; अमित शाहांच्या संपत्तीत घट – PMO

पीएमओकडे जाहीर केली संपत्ती

राष्ट्रीय निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम ज्या प्रमाणे आपण यशस्वी करतो, त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी लस व्यवस्थापन आणि वितरण यशस्वी करावे असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तर गृहमंत्री अमित शाह यांच्या संपत्तीत घट झाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल झालेल्या संपत्तीच्या विवरणातून ही बाब समोर आली आहे.

पीएमओच्या माहितीनुसार, ३० जून रोजी पंतप्रधान मोदींची निव्वळ संपत्ती २.८५ कोटी रुपये होती. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.४९ कोटी रुपये होती. त्यांच्या बँक खात्यात ३.३ लाख रुपये जमा झाल्याने तसेच गुंतवणुकीची ३३ लाख रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याने ही वाढ दिसून येत आहे.

दरम्यान, जून महिन्याच्या शेवटी पंतप्रधान मोदींकडे ३१,४५० रुपये रोख रक्कम होती. तर गांधीनगरच्या एसबीआय बँकेच्या खात्यात २,३८,१७३ रुपये रक्कम होती. त्याचबरोबर याच शाखेत मोदींची मुदत ठेव असून विविध प्रकारे जमा झालेली रक्कम १,६०,२८,९३९ इतकी आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांकडे ८,४३,१२४ रुपयांची राष्ट्रीय बचत पत्रे (एनएससी), १,५०,९५७ रुपयांच्या एलआयसी पॉलिसीज आणि २०,००० रुपयांचे करबचतीचे इन्फ्रा बॉण्ड्सही आहेत. तर १.७५ कोटी रुपयांची अस्थावर संपत्ती आहे.

मोदींच्या नावावर कर्ज नाही, गाडीही नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलेही कर्ज घेतलेले नाही तसेच त्यांच्या नावावर वैयक्तिक गाडीही नाही. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या असून त्यांचे एकूण वजन सुमारे ४५ ग्रॅम इतके असून त्याची किंमत १.५ लाख रुपये आहे. त्याचबरोबर गांधीनगरच्या सेक्टर -१ येथे मोदींच्या नावावर ३,५३१ स्वेअर फूटाचा प्लॉट आहे. मात्र, हा प्लॉटचे तीन जण मालक असून यामध्ये प्रत्येकाची २५ टक्के भागीदारी आहे. हा प्लॉट २५ ऑक्टोबर २००२ रोजी घेतलेला आहे. त्यावेळी त्याची किंमत १.३ लाख रुपये होती.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांची आजची निव्वळ संपत्ती २८.६३ कोटी रुपये आहे, जी गेल्या वर्षी ३२.४ कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुनलेत शाह यांच्या संपत्तीत ४ कोटी रुपयांनी घट झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 11:37 am

Web Title: pm modi richer than last year amit shahs net worth falls says pmo aau 85
Next Stories
1 भयंकर! घरातून पळालेल्या १७ वर्षीय मुलीवर २२ दिवस सामूहिक बलात्कार
2 केरळमधील सोनं तस्करीत दाऊदचा सहभाग असल्याची शंका, एनआयएची कोर्टात माहिती
3 मृत समजून मोठ्या भावाला ठेवलं फ्रीझरमध्ये, पण दुसऱ्या दिवशी घडलं भलतंच…
Just Now!
X