झंझावती भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने अमेरिकन संसदही जिंकून घेतली. अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात अमेरिकन प्रतिनिधी गृहाच्या खास संयुक्त अधिवेशनात मोदी यांचे पाऊण तास भाषण झाले. भाषणादरम्यान सदस्यांनी मोदी यांच्या वाक्यांवर अनेकदा टाळ्या वाजवल्या तसेच अनेकदा हास्याची लकेरही उमटत होती. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी लोकशाही, भारत-अमेरिका संबंध आणि दहशतवादासारख्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. मोदींच्या या भाषणाला अमेरिकन सिनेटर्सनी मनापासून दाद दिली. संपूर्ण भाषणादरम्यान सिनेटर्सनी तब्बल ६६ वेळा टाळ्यांचा गजर केला तर संपूर्ण संसदेने आठ वेळा उभे राहून मोदींना अभिवादन केले.
दहशतवाद पोसणाऱ्यांना एकाकी पाडा!