News Flash

‘या’ तीन राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद

करोना स्थितीबाबत घेतला आढावा

देशात करोनाचं संकट अधिक गहिरं होत आहे. दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी काही राज्यांनी कडक लॉकडाऊन तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. करोना स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. बंगालमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत असतानाही केंद्र सरकार बंगालचा ऑक्सिजन दुसऱ्या राज्यांकडे पाठवत असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली एके-४७ शी तुलना! म्हणाले…

दुसरीकडे काँग्रेसनं केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. राहुल गांधीं सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून निशाणा साधत पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिलं आहे. तर मोदी सरकारने करोना परिस्थितीसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही सोनिया गांधी यांनी सुचवलं आहे.

“फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा…”; भाजपा खासदाराचा खोचक सल्ला

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या रोज नवे उच्चांक गाठत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १४ हजार १८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजीचा विषय ठरत असून सलग ११ व्या दिवशी तीन हजारांहून अधिक बळींची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 3:53 pm

Web Title: pm modi spoke to chief ministers of manipur tripura and sikkim rmt 84
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 करोना, ऑक्सिजन पुरवठ्यावरून नेटिझन्स संतापले, #मोदीइस्तीफादो झालं ट्विटरवर ट्रेंड!
2 “पश्चिम बंगालला ऑक्सिजनची गरज असतानाही केंद्र सरकार…”, ममता बॅनर्जींचा आरोप
3 “देशाला सक्षम आणि द्रष्ट्या नेतृत्वाची गरज”, सोनिया गांधींनी साधला मोदींवर निशाणा!
Just Now!
X