राष्ट्रपती भवनात रंगलेल्या मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून आणि विदेशातून अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यासाठी थोड्या थोडक्या नाही तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यासह इतर देशांतील दिग्गजांनी शपथविधीला हजेरी लावली आहे. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. जाणून घेऊयात कोणा-कोणते दिग्गजांनी हजेरी लावली होती…

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ,
– सोनिया गांधी
– नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा
– प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा
– राकेश ओमप्रकाश मेहरा
– अभिनेते जितेंद्र
– माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
– बाल हक्क चळवळ कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी
– लष्कर प्रमुख बिपीन रावत सोहळ्यासाठी दाखल
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी दाखल
– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी सोहळ्यासाठी उपस्थित
– बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार
– सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई
– भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी
– माजी पंतप्रधान मनमोहनसिंग
– गायिका आशा भोसले
– सुपरस्टर रजनीकांत
– उद्योगपती मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानींसह उपस्थित