भाषणांद्वारे जनतेवर गारुड करण्याची कला अवगत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कवीमनाचे नेते देखील आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच आला, महाबलीपुरम येथे शनिवारी त्यांनी समुद्र किनारी काही काळ फेरफटका मारला. यावेळी त्यांनी समुद्राला उद्देशून चार परिच्छेदांची एक कविताही केली. या कवितेतून त्यांनी समुद्राचा सुर्याशी संबंध तसेच लाटांचा आणि त्यांच्या दुःखाचा संबंध याचा उल्लेख केला आहे. रविवारी आपल्या ट्विटर हँडलवर त्यांनी ही कविता शेअर केली.

पंतप्रधान ट्विटमध्ये म्हणतात, काल महाबलीपुरम येथे पहाटे किनाऱ्यावर फिरत असताना मी सागराशी संवाद करण्यात गढून गेलो. सागराशी झालेला हा संवादच माझे भावविश्व आहे. या भावनांना शब्दबद्ध करुन आपल्याशी शेअर करीत आहे. यापूर्वी मोदींचा ‘एक यात्रा’ नावाचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.

मोदी म्हणतात…

हे सागर!!!
तुम्हें मेरा प्रणाम!
सतह पर चलता ये कोलाहल, ये उत्पात,
कभी ऊपर तो कभी नीचे!
गरजती लहरों का प्रताप,
ये तुम्हाला दर्द है, आक्रोश है
या फिर संताप?
तुम न होते विचलित
न आशंकित, न भयभीत
क्योंकी तुममें है गहराई!

चीनचे राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची महाबलीपुरम येथे बैठक झाली. येथे दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि चीनशी संबंधीत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान म्हणाले, दोन्ही देशांमधील मतभेदांना आपण वादाचे मुद्दे बनू देणार नाही.