पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जवळजवळ आठ महिन्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजेच वाराणसीला जाणार आहे. पंतप्रधान मोदी काशीला जवळजवळ १५८३ कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहेत. मागील वर्षी देव दिवाळीच्या वेळेस मोदी वाराणसीला गेले होते. नवीन वर्षामध्ये पहिल्यांदाच मोदी आपल्या मतदारसंघाला भेट देणार आहे. या दौऱ्यासंदर्भातील सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा विषयक तयारी झालेली आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:च काशी दौऱ्यासंदर्भात बुधवारी रात्री काही ट्विटसही करत सविस्तर माहिती दिली.

पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी, “उद्या, १५ जुलै. मी काशीमध्ये १५०० कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचं उद्घाटन करणार आहे. ही सर्व कामं काशी आणि संपूर्ण पूर्वांचलमधील लोकांचं जीवन अधीक सुखकर (म्हणजेच इज ऑफ लिविंग) करेल,” असं मोदींनी बुधवारी म्हटलं.

नक्की वाचा >> ब्राह्मण कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची दिली धमकी; पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मला वाराणसीमधील कनव्हेन्शन सेंटर रुद्राक्षचं उद्घाटन करताना आनंद होत आहे. जपानच्या मदतीने बनवण्यात आलेलं हे केंद्र बनारसमधील सम्मेलनांसाठी एक आकर्षक केंद्र म्हणून समोर येईल. यामुळे बनारस शहर अधिक पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना आकर्षीत करेल, असा विश्वास व्यक्त केलाय.

असा असणार मोदींचा वाराणसी दौरा

पहिला कार्यक्रम : मोदी सकाळी दहा वाजता बाबतपूर विमानतळावर विशेष विमानाने दाखल होती. त्यानंतर लष्काराच्या हेलिकॉप्टरने ते बीएचयू हेलिपॅडवर पोहचतील. पंतप्रधान मोदी बीएचयू कॅम्पसमधील एमसीएच विंगमध्ये जातील. जिथे शंभर बेड्स असणाऱ्या एमसीएच विंगचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. येथील सोयी सुविधांची ते पहाणी करतील. त्यानंतर करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात ते डॉक्टर आणि पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांबरोबर संवाद साधतील. दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा मोदींच्या हस्ते सत्कार होणार आहे.

नक्की वाचा >> ‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये

दुसरा कार्यक्रम : इथून मोदी थेट बीएचयू आयआयटी मैदानात पोहचतील. इथे मोदी काशीसाठी जवळवजळ १५८३ कोटींच्या योजनांची घोषणा करुन त्याचं उद्घाटन करतील. त्यानंतर येथे एक छोटी सभा होईल.

तिसरा कार्यक्रम : सभेनंतर मोदी लष्कराच्या हेलिकॉप्टरने संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयामध्ये पोहचतील येथून ते रस्ते मार्गाने रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरला पोहचतील. येथे रुद्राक्ष कनव्हेन्शन सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ऑडीटोरियममधील काशीतील ५०० वयस्कर लोकांशी संवाद साधतील. तसेच ते येथे रुद्राक्षाचं झाडही लावणार आहे. कार्यक्रमाममध्य जपानचे पंतप्रधान व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. ते व्हिडीओ कॉलवरुन यासंदर्भात आपलं मत मांडतील. तसेच जपानी दुसातवातील अधिकाऱ्यांची एक तुकडी या ठिकाणी उपस्थित अशणार आहे. तीनच्या आसपास हा कार्यक्रम संपल्यानंतर मोदी पूर्ण संपूर्णानंद विश्वविद्यालयामध्ये पोहचतील आणि तिथून हेलिकॉप्टरने ते पुन्हा बाबतपूर विमानतळावर येथील. येथून ते दिल्लीला रवाना होतील.