माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (दि.२१) पुण्यतिथी असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीर भूमी येथे जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्याचबरोबर युपीएच्या अध्यक्षा आणि राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा, रॉबर्ट वढेरा तसेच इतर दिग्गज नेत्यांनीही राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.