27 November 2020

News Flash

मुस्लिम महिलांना न्याय मिळायला हवा- पंतप्रधान मोदी

तोंडी तलाकबद्दल बोलताना मोदींचे प्रतिपादन

पंतप्रधान मोदी

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी तोंडी तलाकचा मुद्दा उपस्थित केला. ‘मुस्लिम महिलांना न्याय मिळायला हवा,’ असे पंतप्रधान मोदी यांनी कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना म्हटल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ‘जर समाजात वाईट प्रवृत्ती असतील, तर समाजातील सर्वांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा आणि पीडितांना न्याय मिळवून द्यायला हवा,’ असे पंतप्रधन मोदी यांनी म्हटल्याचे गडकरी यांनी सांगितले.

‘पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक न्यायावर भाष्य केले. मुस्लिम भगिनींनादेखील न्याय मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले. त्यांच्यासोबत अन्याय व्हायला नको. या मुद्यांवरुन मुस्लिम समाजात वाद व्हावेत, असे आम्हाला अजिबात वाटत नाही. आम्हाला फक्त समाजातील चुकीच्या प्रवृत्तींविरोधात पावले उचलायची आहेत. आम्हाला अपप्रवृत्तींच्या विरोधात समाजात जागरुकता निर्माण करुन मुस्लिम महिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मनातील हीच इच्छा बोलून दाखवली,’ असे नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ईव्हीएम मशीनवरुन भाजपवर टीका करणाऱ्या विरोधकांवरदेखील पंतप्रधान मोदी यांनी निशाणा साधला. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांआधी जाणीवपूर्वक ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. ‘विरोधक प्रत्येक वेळी नवीन मुद्दा काढत असतात. दिल्ली निवडणुकीवेळी त्यांनी चर्चवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. बिहारमधील निवडणुकीवेळी पुरस्कार वापसीचा मुद्दा चर्चेत आणला आणि आता ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

पक्षाच्या कार्यकारणीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. भावनेच्या भरात न बोलण्याच्या सूचना मोदींकडून देण्यात आल्या. ‘तुमच्या मनात कोणत्याही तक्रारी असल्यास त्या पक्षाच्या नेत्यांना सांगा. संबंधित नेते तुमच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचवतील,’ असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 7:51 pm

Web Title: pm modi triple talaq muslim women justice
Next Stories
1 लष्करातील जवानांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त
2 ईव्हीएममध्ये घोळ असण्याची ओरड केवळ दिल्ली निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊनच- मोदी
3 VIDEO: अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरवर शीख समुदायाकडून पगडी दिन साजरा
Just Now!
X