पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले आहे.

  • राहुल गांधी यांच्या शुभेच्छा

खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दिल्या शुभेच्छा

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, मी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो. दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी मिळून काम करुयात.

  • फिनलँडच्या पंतप्रधान सना मारीन यांच्या सदिच्छा

फिनलँडच्या पंतप्रधान सना मारीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांचे संबंध आणखी चांगल्या प्रकारे पुढे नेण्याची आशा आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

  • अमित शाह यांच्याकडून मोदींच्या कार्याचा गौरव

  • भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सदिच्छा

  • सीआरपीएफकडून पंतप्रधानांना सदिच्छा

  • भाजपाकडून देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांसह इतर राज्यांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. गरजूंना मदत, रक्तदान शिबिरं, नव्या योजनांची सुरुवात, विविध समाजोपयोगी अभियान अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.