News Flash

वादग्रस्त वक्तव्य करणा-या भाजप नेत्यांना अमित शहांची ताकिद

भाजप नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून अमित शहांनी त्यांना ताकिद बजावली आहे.

भाजप नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना कंटाळून भाजपाध्यक्ष अमित शहांनी त्यांना ताकिद बजावली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, महेश शर्मा, संगीत सोम आणि साक्षी महाराज यांना ताकिद देण्यात आली असून, वादग्रस्त विधान न करण्याची तंबी शहा यांनी आज दिली.

भाजपाच्या मंत्री व खासदार,आमदार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी दर्शवल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ही तंबी दिल्याचे समजते.बिहार निवडणुका सुरु असताना भाजप पक्षाला आव्हांनांना सामोरे जावे लागत आहे. त्यातचं, सतत पक्षातील नेत्यांकडून केली जात असलेली वादग्रस्त वकव्ये पक्षाच्या अडचणींमध्ये वाढचं करत असल्याचे चित्र आहे.  दादरी येथील प्रकरणानंतर मनोहरलाल खट्टर, महेश शर्मा, संगीत सोम आणि साक्षी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे विरोधी पक्षासह साहित्यिकांच्या प्रतिक्रयांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, याच्या निषेधार्थ एकापाठोपाठ एक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कारही परत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 12:37 pm

Web Title: pm modi upset amit shah summons bjp leaders warns against making any further controversial remarks
Next Stories
1 गाय मारणाऱ्याला ठार करणेच योग्य! संघाच्या मुखपत्रात ‘दादरी’चे उदात्तीकरण
2 न्यायिक आयोगाला काँग्रेसचा पाठिंबा नाही
3 हार्वर्डचा मानवतावाद पुरस्कार कैलाश सत्यार्थी यांना प्रदान
Just Now!
X