अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱयावर असताना हैदराबाद हाऊसमधील संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी घातलेल्या कोट वरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या पत्रकार परिषदेत मोदींनी स्वत:चे संपूर्ण नाव उभ्या रेषेत लिहीलेला कोट परिधान केला होता. स्वत:चे संपूर्ण नाव लिहीलेला अशा प्रकारचा कोट परिधान करणे म्हणजे मूर्खपणा असल्याचा खरमरीत टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लगावला तर, काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी मोदींच्या आत्म मग्नतेचे आश्चर्यच वाटते, असे उपहासात्मक ट्विट केले आहे. मोदींनी परिधान केलेल्या या कोटवरून सोशल मिडीयावर देखील टीका सुरू झाली आहे तर, काहींनी मोदींचे समर्थन केले आहे.
हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत मोदींनी बंद गळ्याचा कोट घातला होता. त्यावर बारीक अक्षरांत सरळ रेषेत ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे लिहील्याचे समोर आले. मोदींचा हा कोट अहमदाबादमधील झेड ब्लू टेलर्समध्ये तयार करण्यात आला आहे. इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक हेदेखील असे सूट घालण्यासाठी ओळखले जात होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2015 4:46 am