News Flash

लहान मुलांनी आजी आजोबांची मोबाइलवर मुलाखत घ्यावी, मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही प्रश्नही सुचवले आहेत

अनेक लोक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोलेळी हात धुवायचे. मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजाबदारपणा वाढल्याचे दिसते.

लहान मुलांनी आपल्या आजी आणि आजोबांची मुलाखत मोबाइलवर घ्यावी. त्यांना विविध प्रश्न विचारावेत असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ दरम्यान केलं. आज सकाळी ११ वाजता त्यांनी देशाशी रेडिओवरुन संवाद साधला. या संवादात त्यांनी देशभरातल्या लहान मुलांना हे आवाहन केलं आहे. रिपोर्टर ज्याप्रमाणे मुलाखत घेतो ते तुम्ही पाहिलं असेल अगदी तशाच प्रकारे आपल्या आजी आजोबांची मुलाखत घ्या. तुमच्यासाठी तो आठवणींचा एक ठेवा असेल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यासाठीचे काही प्रश्नही मोदींनी सुचवले आहेत.

मोदींनी लहान मुलांना सुचवले हे प्रश्न

  • आपल्या आजी-आजोबांना विचारा की तुम्ही तुमचं लहानपण कसं घालवलंत?
  • तुम्ही तुमच्या लहानपणी कोणते खेळ खेळत होतात?
  • तुम्ही तुमच्या लहानपणी सण आणि उत्सव कशा प्रकारे साजरे करत होतात?
  • तुम्ही जर शेतावर जात असाल तर तिथे काय धमाल करायचात?
  • तुम्हाला तुमचे आई-वडील कोणत्या गोष्टी सांगायचे?

हे आणि असे काही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांना सुचवले आहेत. लहान मुलांनी हा व्हिडीओ रेकॉर्ड करावा जेणेकरुन एक आठवणींचा ठेवा त्यांच्याजवळ राहिल. तर जी बुजुर्ग मंडळी आहेत त्यांनाही आपला भूतकाळ आठवून आनंद होईल. तसंच आपण जपलेला ठेवा ते पुढच्या पिढीला देऊ शकतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातद्वारे देशाशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी चीन, करोना, लॉकडाउन यांसारख्या विषयांवरही भाष्य केलं. भारताकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना लष्कराने करारा जवाब दिला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तर आपल्या देशात गेल्या सहा महिन्यांमध्ये अनेक संकटं आली, तरीही आपण सगळे डगमगून न जाता संकटांचा सामना करतो आहोत. हे वर्ष वाईट नाही आणखी कितीही संकटं आली तरीही आपण त्यांचा मुकाबला करु शकतो असाही आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:23 pm

Web Title: pm modis appeal to children of india about the mobile interview of there grand parents in maan ki baat scj 81
Next Stories
1 वर्षभरात ५० संकटं आली तरीही डगमगून जायची गरज नाही – मोदी
2 लडाखमध्ये चीनला भारताने ‘करारा जवाब’ दिला आहे-मोदी
3 करोनाचा नकोसा विक्रम! २४ तासांत १९,९०६ जणांना संसर्ग
Just Now!
X