पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे एका महाविद्यालयीन तरूणी तिच्या गावातली सेलिब्रेटीच ठरली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होता. या दौऱ्यात मंडप कोसळून काही लोक जखमी झाले. या जखमींमध्ये रीता मुदी ही महाविद्यालयीन तरूणीही होती. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण संपले तेव्हा त्यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यावेळी ते रीता मुदीचीही भेट मोदींनी घेतली आणि विचारपूस केली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रीताने ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत मोदींनी आपली ऑटोग्राफही दिली. याच ऑटोग्राफने तरूणीचे आयुष्य बदलून गेले. रिता मुदी आणि तिला मिळालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑटोग्राफ चर्चेचा विषय ठरली.

रीता मोदी तू सुखी राहा असा संदेश लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला ऑटोग्राफ दिली. या ऑटोग्राफची चर्चा चांगलीच रंगली आहे. एवढेच नाही तर या ऑटोग्राफनंतर या तरूणीला लग्नाच्या मागण्याही येऊ लागल्या आहेत. मी जखमी झाले तेव्हा मला रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. मी त्यांना ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. त्यावर सुरूवातीला ते नाही म्हटले पण मी आग्रह केला तेव्हा त्यांनी मला ऑटोग्राफ दिली असे या तरूणीने सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

रीता मुदी ही बांकुरा ख्रिश्चन महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकते आहे. रीता तिच्या आई आणि बहिणीसोबत मोदींची सभा पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी मंडप कोसळून झालेल्या अपघातात ती जखमी झाली. नरेंद्र मोदींच्या ऑटोग्राफने एवढी जादू केली की या तरूणीची चर्चा तिच्या गावात चांगलीच रंगली आहे. अगदी हुंडा न घेताही तिच्याशी लग्न करण्यास मुले तयार आहेत अशीही माहिती तिच्या आईने आणि बहिणीने दिली. तसेच सध्या माझी मुलगी शिकत असल्याने तिच्या लग्नाचा विचार नाही असेही तिच्या आईने सांगितले.