11 August 2020

News Flash

नरेंद्र मोदी यांची पदवी वैध दिल्ली विद्यापीठाचा स्पष्ट निर्वाळा

मोदी १९७८ मध्ये बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९७९ मध्ये त्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

| May 11, 2016 02:25 am

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बीएची पदवी वैध असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिल्ली विद्यापीठाने मंगळवारी दिला.

मोदी यांच्या पदवी शिक्षणाबाबतच्या सर्व नोंदी विद्यापीठाकडे आहेत, त्यांच्या पदवीवर १९७९ हे साल दर्शविण्यात आले असून ती किरकोळ चूक आहे, त्यापूवीर्च एक वर्ष मोदी उत्तीर्ण झाले आहेत, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

आप आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरुण दास यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. आम्ही आमच्याकडील नोंदी तपासून पाहिल्या असून मोदींची पदवीही वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे दास म्हणाले.

मोदी १९७८ मध्ये बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९७९ मध्ये त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. आपचे शिष्टमंडळ विद्यापीठात पदवीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी गेले होते त्यानंतर विद्यापीठाने वरील बाब स्पष्ट केली. मोदी यांच्या नावांतील फरकाबाबत दास म्हणाले की, वडिलांचे नाव चुकणे ही सर्वसाधारण चूक आहे, अन्य विद्यार्थ्यांनीही अशी चूक निदर्शनास आणून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:25 am

Web Title: pm modis ba degree authentic du registrar
Next Stories
1 गॅस प्रकल्पांतील अनियमितता; राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ
2 सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून प्रचारमोहीम
3 दिल्लीत यापुढे नव्या डिझेल टॅक्सी नोंदणीस बंदी
Just Now!
X