25 February 2021

News Flash

“दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद

दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा झाला हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्याग, तपस्या आणि बलिदान या तीन तत्त्वांवर भाजपा हा पक्ष उभा आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओद्वारे आज भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज भाजपाचा चाळीसावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने त्यांनी हा संवाद साधला.

करोनाशी दोन हात करताना सगळा देश एकवटला आहे. सगळ्या जगाने भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारने करोनाबाबत कठोर निर्णय घेतले आणि जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. करोनाशी लढा देताना आपण गरीबीशी लढतो आहोत ही बाबही महत्त्वाची आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

करोनाशी दोन हात करताना भारताने केलेल्या प्रयत्नांचे WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कौतुक केलं आहे. करोनाविरोधात आपल्याला मोठी लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कालही अवघ्या देशाचं धैर्य पाहण्यास मिळालं. असंख्य दिव्यांनी करोनाचा अंधार दूर केला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींनी सांगितलेले पाच संकल्प
१. गरिबांच्या राशनसाठी अविरत सेवा अभियान
२. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या
३. धन्यवाद अभियान राबवा
४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा
५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:00 pm

Web Title: pm modis message on bjps 40th foundation day today scj 81
Next Stories
1 Coronavirus: अमित शाह ठणठणीत; त्या एका फोटोमुळे सरकारलाच करावा लागला खुलासा
2 सकारात्मक बातमी… दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच पृथ्वीवर एवढी स्वच्छ हवा
3 गो करोना गो… करोनाला पळवण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षाचा हवेत गोळीबार
Just Now!
X