26 February 2021

News Flash

भारत आणि चीनने परिपक्वता, हुशारी दाखवल्यामुळे आज सीमेवर शांतता – नरेंद्र मोदी

भारतात व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूर दौऱ्यावर शांगरी ला डायलॉग परीषदेत सांगितले.

पंतप्रदान नरेंद्र मोदी, संग्रहित छायाचित्र

भारत आणि चीनमध्ये व्यापार वाढत असून दोन्ही देशांमध्ये सहकार्य विस्तारत आहे. मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी जी परिपक्वता आणि हुशारी दाखवली त्यामुळे आज सीमेवर शांतता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सिंगापूर दौऱ्यावर शांगरी ला डायलॉग परीषदेत ते बोलत आहेत.

भारतात व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोदी म्हणाले.हजारो वर्षांपासून भारतीय पूर्वे दिशेला फक्त सूर्योदय पाहण्यासाठी नव्हे तर तो प्रकाश संपूर्ण जगाला मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत. सिंगापूर हे भारताचे पूर्वेचे प्रवेशद्वार आहे असे मोदी म्हणाले.

 

हिंदी महासागर क्षेत्राने मोठया प्रमाणात भारताच्या इतिहासाला आकार दिला. या क्षेत्राकडे भविष्याची चावी आहे. भारताचा ९० टक्के व्यापार हिंदी महासागर क्षेत्रात चालतो. जागतिक व्यापाराची ही लाईफ लाईन आहे असे मोदी म्हणाले. प्रत्येक दक्षिण आशियाई देशाबरोबर आज भारताचे आर्थिक, राजकीय आणि संरक्षण संबंध दृढ होत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 6:14 pm

Web Title: pm narendara modi shangri la dialogue singapore
Next Stories
1 FB बुलेटीन: देशभरातील बळीराजा संपावर, अनुदानित सिलिंडर महागले आणि अन्य बातम्या
2 इस्त्रायलकडून राफेल क्षेपणास्त्र खरेदीचा प्रस्ताव पुन्हा विचाराधीन
3 आंबेडकरांच्या पुतळ्याचं पुन्हा भगवीकरण, भाजपा नेत्याचा सहभाग
Just Now!
X