भारत आणि चीनमध्ये व्यापार वाढत असून दोन्ही देशांमध्ये सहकार्य विस्तारत आहे. मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी जी परिपक्वता आणि हुशारी दाखवली त्यामुळे आज सीमेवर शांतता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सिंगापूर दौऱ्यावर शांगरी ला डायलॉग परीषदेत ते बोलत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मोदी म्हणाले.हजारो वर्षांपासून भारतीय पूर्वे दिशेला फक्त सूर्योदय पाहण्यासाठी नव्हे तर तो प्रकाश संपूर्ण जगाला मिळावा यासाठी प्रार्थना करत आहेत. सिंगापूर हे भारताचे पूर्वेचे प्रवेशद्वार आहे असे मोदी म्हणाले.

 

हिंदी महासागर क्षेत्राने मोठया प्रमाणात भारताच्या इतिहासाला आकार दिला. या क्षेत्राकडे भविष्याची चावी आहे. भारताचा ९० टक्के व्यापार हिंदी महासागर क्षेत्रात चालतो. जागतिक व्यापाराची ही लाईफ लाईन आहे असे मोदी म्हणाले. प्रत्येक दक्षिण आशियाई देशाबरोबर आज भारताचे आर्थिक, राजकीय आणि संरक्षण संबंध दृढ होत आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendara modi shangri la dialogue singapore
First published on: 01-06-2018 at 18:14 IST