News Flash

“पाकिस्ताननं भारताच्या पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण…”

जगाच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट चांगला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच कारगिल विजय दिनाचं स्मरण केलं. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा असून, २१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही,” असं सांगत मोदी यांनी शहिदांच्या शौर्याला अभिवादन केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले,”२१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करानं विजयाचा झेंडा फडकावला होता. कारगिल युद्ध ज्या परिस्थितीमध्ये झालं, ते भारत कधीही विसरू शकत नाही. पाकिस्ताननं मोठंमोठं मनसुबे ठेवून भारताच्या भूमीवर कब्जा करण्यासाठी आणि स्वतःच्या देशातील अंतर्गत कलहांवरून लक्ष हटवण्यासाठी हे धाडस केलं होतं. भारत त्यावेळी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून प्रयत्न करत होता. पण म्हणतात ना दुष्टाचा स्वभावचं असतो की, प्रत्येकाशी कोणतंही कारण नसताना शत्रुत्व करणं. अशा स्वभावाचे लोकं जे चांगलं करतात, त्यांच्याही नुकसानीचा विचार करतात. त्यामुळेच भारताकडून मैत्रीचे प्रयत्न होत असताना पाकिस्तानकडून पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यानंतर भारताच्या पराक्रमी सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली. हे सगळं संपूर्ण जगानं बघितलं. तुम्ही कल्पना करू शकता, उंच पहाडांवर असलेला शत्रू आणि खालून लढणारं भारताचं लष्कर. पण विजय पहाडांचा नाही झाला, तर भारताच्या खऱ्या शौर्याची झाला,” असं मोदी म्हणाले.

“आता युद्ध केवळ सीमेवरच लढलं जात नाही. देशातही लढलं जात. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशानं एकजुटीन करोनाचा सामना केला. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या. देशातील रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्युदरही कमी आहे. एकाही व्यक्तीला गमावणं चुकीचं आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की, करोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे काळजी घेणं हेच आपलं शस्त्र आहे,” असंही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 11:11 am

Web Title: pm narendra modi address people by man ki baat bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक : ३,३०० करोना रुग्णांचा पत्ताच लागेना, बंगळुरूत संसर्गाचा नवाच ‘ताप’
2 पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, करोना होईल बरा; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सूचवला उपाय
3 चिंताजनक! देशातील करोनाबळी ३२ हजारांच्या पुढे
Just Now!
X