अडचणींना कायम ठेवणे ही आमची वृत्ती नाही, हे आमचे संस्कार नाही व आमचा मार्ग देखील नाही. आम्ही एकीकडे दिल्लीतील जवळापास दोन हजार व्हीआय़पींचे बंगले खाली केलेच, मात्र याचबरोबर दिल्लीच्या ४० लाखांपेक्षा अधिक गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या घराचा हक्क देखील मिळवून दिला. त्यांचे व्हीआय़पी त्यांना लखलाभ, माझ्यासाठी तर तुम्हीच लोक व्हीआयपी आहात, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोदी बोलत होते.

दिल्लीतील सर्वात अलिशान व सर्वात महागड्या भागात दोन हजारांपेक्षा जास्त बंगले अवैधरित्या त्यांनी आपल्या उद्योजकांना दिले होते. या बदल्यात कोणाला काय मिळाले? याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पूर्वी जे सरकार होते त्यांनी या बंगल्यातील रहिवाशांना पूर्ण मोकळीक दिली होती. मात्र तुमच्यासाठी काहीच केले नाही. मात्र आम्ही करत असताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असा देखील यावेळी काँग्रेस सरकारवर मोदींनी आरोप केला.

हे रामलीला मैदान अनेक ऐतिहासीक क्षणाचे साक्षीदार ठरलेले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीस सांगितले.

याप्रसंगी बोलतान मोदी म्हणाले की, मला समाधान आहे की दिल्लीतील ४० लाखांपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात, नवी पहाट आणण्याची एक उत्तम संधी मला व भाजपाला मिळाली. प्रधानमंत्री उदय योजनेच्या माध्यामातून तुम्हाला तुमच्या घरी, तुमच्या जमिनीवर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई संपूर्ण अधिकार मिळाला आहे. यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्या लोकांनी दिल्लीकरांना या अधिकारापासून वंचित ठेवले होते, विविध अडचणी आणल्या त्यांनी पाहावे की, आपला अधिकार मिळाल्याचा आनंद कसा असतो. स्वातंत्र्याच्या एवढ्या दशकानंतरही दिल्लीतील मोठ्या वर्गास कपाटाने व धाकाने तसेच खोट्या राजकीय आश्वासनांद्वारे अधिकारापासून वंचित ठेवले जात होते. निवडणुका आल्या की केवळ तारखा वाढवल्या जात होत्या मात्र समस्या कायम होती.

तुम्हाला या चिंतेतून मुक्त करण्याची तयारी त्यांनी कधीच दाखवली नाही. जेव्हा गरिबासाठी, मध्यवर्गीयांसाठी काम करायचे असते, तेव्हा त्यांचा कामाच वेग काय असतो हे त्यांच्या आश्वासनांवरून स्पष्ट होते. २०२१ पर्यंत काहीच करू शकत नाहीत, असे ते सांगत होते. त्यामुळेच आम्ही यावर्षी मार्चमध्ये हे काम आम्ही आमच्या हाती घेतली व लोकसभा व राज्यसभेत दिल्लीतील वसाहतींशी निगडीत विधेयक पारित केले आहे. एवढ्या कमी वेळात दिल्लीतील १७०० पेक्षा जास्त वसाहतींची मर्यादा निश्चित करण्यात आली आहेत. सर्व माहिती पोर्टलवर आहे. हा वसाहतींचा मुद्दा येथील कारभारस देखील चालना देणारा आहे. अडचणींना कायम ठेवणे ही आमची वृत्ती नाही, हे आमचे संस्कार नाही व आमचा मार्ग देखील नाही.

ज्यांच्यावर तुम्ही या कामासाठी विश्वास दर्शवला होता, ते काय करत होते हे जाणुन घेणे गरजेचे आहे. या लोकांनी दिल्लीतील सर्वात अलिशान व सर्वात महागड्या भागात दोन हजारांपेक्षा जास्त बंगले अवैधरित्या आपल्या उद्योजकांना दिले होते. या बदल्यात कोणाला काय मिळाले? याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पूर्वी जे सरकार होते त्यांनी या बंगल्यातील रहिवाशांना पूर्ण मोकळीक दिली होती. मात्र तुमच्यासाठी काहीच केले नाही. मात्र आम्ही करत असताना अडचणी निर्माण केल्या जात होत्या.

दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती वैध करण्यासाठीच्या मुद्द्यावर भाजपाकडून रामलीला मैदानात ‘धन्यवाद’ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास दोन लाखांपर्यंतची गर्दी या सभेला होणार असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आल्याने. सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय, अनुचित प्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची नजर देखील ठेवण्यात आली होती. दिल्लीत शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या निदर्शनानंतर हिंसाचार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, तसेच जामियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही सभा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसमोर आव्हान होते.