देशभरातील अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारने दिलासा असून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही वाढ पुढील महिन्यापासून लागू होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आशा आणि अंगणवाडी सेविकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यादरम्यान त्यांनी माधनात वाढ करण्याची घोषणा केली. आतापर्यंत ज्यांना ३ हजार रुपये मिळत होते, त्यांना आता ४ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना २ हजार २०० रुपये मिळत होते. त्यांना ३ हजार ५०० मिळणार आहे. अंगणवाडी मदतनीसांचे मानधनही १५०० रुपयांवरुन २,२५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

आशा कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या नित्य प्रोत्साहनात दुप्पट वाढ पंतप्रधानांनी जाहीर केली. याखेरीज सर्व आशा कार्यकर्त्यांना आणि मदतनीसांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत मोफत विमा संरक्षण दिले जाणार आहे.
तसेच ‘कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर’ (आयसीडीएस-सीएस) यासारखी तंत्रसाधने वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अतिरिक्त प्रोत्साहन पंतप्रधानांनी जाहीर केले. कामगिरीवर आधारित २५० रुपये ते ५०० रुपये ते असेल.

अंगणवाडी सेविका/मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेमुळे पोषण अभियानांतर्गत सेवा अधिक सुधारेल, असे महिला आणि बालविकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi announces increase in remuneration for asha anganwadi workers
First published on: 11-09-2018 at 18:46 IST