News Flash

#coronavirus : सगळे मिळून आकस्मिक निधी उभा करू, सार्क देशांना मोदींचे आवाहन

भारताकडून १ कोटी डॉलर देण्याची तयारी

सध्या संपूर्ण जगभरात जीवघेण्या करोना व्हायरसने दहशत माजवलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून तर करोनाला महारोगराई असं घोषित करण्यात आलेलं आहे. शिवाय, जगभरात आतापर्यंत यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हजाराच्या घरात पोहचला असून या विषाणूची बाधा झालेल्यांचा आकडा लाखात आहे. भारतातही करनोच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या महारोगराईपासून देशाची व जगाची सुटका करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना करोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज  असल्याचे सांगितले.  तसेच, यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन करत, भारताकडून यासाठी १ कोटी डॉलरचा निधी देण्याचीही मोदींनी तयारी दर्शवली.

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे.

करनो व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत कोविड-१९ साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. शिवाय, भारताकडून यासाठी एक कोटी डॉलरची मदत दिली जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपले लोकपातळीवरील संबंध प्राचीनकाळापासून आहेत. आपल्या समाज एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने तयारी करून कृती करावी व सामूहिक यश मिळावावे. आपल्याला करोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तर एकत्र येवून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. सार्क राष्ट्रांना सतर्क राहावे लागेल. सार्क राष्ट्रांमध्ये १५० पेक्षा कमी व्यक्ती आढळले आहेत. भारतात करोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला महारोगराई घोषित केलं आहे. करोनपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. भारतात जानेवारीपासून स्क्रीनिंग केली जात आहे. करोनाचा धोका पाहता १४०० भारतीयांना जगभरातील विविध देशांमधून परत आणण्यात आले आहे. याचबरोबर शेजारील देशाच्या काही नागिराकांना देखील आम्ही मदत केली असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम  सोलिह यांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करत म्हटले, संकट काळात आपण एकत्र आलो आहोत. कोणतेच राष्ट्र या व्हायरसशी एकटच लढू शकत नाही, यामध्ये सर्वांची मदत हवी आहे. मालदीव नशीबवान आहे, आम्हाला भारताची मदत मिळाली.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले, श्रीलंकेत हा व्हायरस पसरू नये, हेच आमच्यासमोर मोठं आव्हान आहे. श्रीलंकेत परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवलं जात आहे. आमच्या देशातील विद्यापीठ व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचे चर्या आयोजानासाठी पुढाकर घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, वुहानमधील २३ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी धन्यवादही दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 7:09 pm

Web Title: pm narendra modi at video conference of all saarc member countries msr 87
Next Stories
1 जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी पकडला
2 गुजरात काँग्रेसही फुटीच्या मार्गावर : दोन आमदारांचा राजीनामा, तिघे नॉट रिचेबल; १४ जणांना जयपूरला पाठवलं
3 दहशतवादी संघटना आयसिसलाही करोनाची धास्ती, अतिरेक्यांसाठी जाहीर केली नियमावली
Just Now!
X