28 February 2021

News Flash

भाजपा आमदाराच्या ‘बॅटिंग’वर मोदी भडकले !

भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांचा महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोदींनी खडसावलं आहे

काही दिवसांपुर्वी भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांचा महापालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना हे अस्वीकार्य असल्याचं म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या संसदीय पक्ष बैठकीत बोलताना नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारची वागणूक अस्वीकार्य आहे. मग तो कोणाचाही मुलगा असो अशा शब्दांत खडसावलं.

काही दिवसांपुर्वी भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत ते महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारताना दिसत होते. इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आकाश विजयवर्गीय हे त्यांच्यावर धावून गेले. याप्रकरणी आमदार आकाश यांना पोलिसांनी अटक केली होती.

भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण

संसदीय पक्ष बैठकीत सहभागी एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाश विजयवर्गीय यांच्या वागणुकीवर प्रचंड नाराज आहेत. आकाश विजयवर्गीय यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याचं स्वागत करणाऱ्या स्थानिक भाजपा युनिटला बरखास्त केलं पाहिजे असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं’. अशा नेत्यांची पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे असंही मत मोदींनी यावेळी व्यक्त केल्याचं यावेळी नेत्याने सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा नेत्यांना पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे. मोदींनी पक्षातील नेत्यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी नेत्यांना जास्तीत जास्त वेळ आपल्या मतदारसंघात व्यतित करण्याचा तसंच सामान्य माणसांचे प्रश्न उपस्थित करण्याचाही सल्ला दिला.

काय आहे प्रकरण –

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटने मारहाण केली होती. इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आकाश विजयवर्गीय हे त्यांच्यावर धावून गेले.

सुरूवातीस महापालिका अधिकारी व आकाश विजयवर्गीय यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आकाश यांनी बॅट घेऊन अधिकाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी आकाश यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील या अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

आकाश विजयवर्गीय हे या अगोदर देखील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. ते सध्या इंदुर-३ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. तर त्यांचे वडिल कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. शिवाय पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणुन त्यांच्यावर जबाबदारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 2:29 pm

Web Title: pm narendra modi bjp mp aakash vijayvargiya son of senior leader kailash vijayvargiya bjp parliamentary meeting sgy 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 प्रत्यार्पणाविरुद्ध मल्याच्या अपिलावर आज सुनावणी
3 अखंडतेचा भंग केल्यास जशास तसे प्रत्युत्तर : शहा
Just Now!
X