News Flash

अमित शाह हे नवे गृहमंत्री, निर्मला सीतारमन अर्थमंत्री

निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

२४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांना शुक्रवारी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालयाची तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. शुक्रवारी दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

डॉ. सुब्रमण्यन जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश पोखरियाल निषांक यांच्याकडे मनुष्यबळ विकास खाते, अर्जुन मुंडा यांच्याकडे आदिवासी कल्याण खाते, स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण व वस्त्रोद्योग खाते, डॉ हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान खाती, प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खाते, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे व कॉमर्स व इंडस्ट्री खाते, धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम गॅस व पोलाद खाते, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खाते, प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज खाते व महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे कौशल्य विकास खाते सोपवण्यात आले आहे.

नरेंद्र सिंह तोमर यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून स्मृती इराणी यांची महिला आणि बाल विकासमंत्री, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धूरा रमेश पोखरियाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

राम विलास पासवान यांच्याकडे ग्राहक संरक्षण खाते, रवीशंकर प्रसाद यांच्याकडे विधी खाते व ग्रामविकास खाते, हरसिमरत कौर यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग खाते, थावर सिंग गेहलोत यांच्याकडे सामाजिक न्याय व सबलीकरण खाते सोपवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:01 pm

Web Title: pm narendra modi cabinet amit shah get home ministry nirmala sitharaman finance minister 2
Next Stories
1 ‘पुढची १० ते १५ वर्ष कपालभाती करा’, रामदेव बाबांचा विरोधकांना सल्ला
2 धक्कादायक : इम्रान खान झाला कबीर शर्मा, नववधूसह फरार
3 लग्नाच्या वरातीवर दगडफेक, एकाचा मृत्यू
Just Now!
X