नरेंद्र मोदींनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला, काही मंत्र्यांची खाती बदलली तर एकूण ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात जदयू, एआयडीएमके यांनाही स्थान मिळेल असे वाटत होते, मात्र तसे काहीही घडले नाही. त्याचमुळे नितीशकुमार यांच्यावर भाजपला विश्वास उरलेला नाही अशी टीका राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी साधे निमंत्रणही दिले नाही यावरूनच सगळे चित्र स्पष्ट होते.

नितीशकुमार प्रसारमाध्यमांना सांगत फिरत आहेत, की मंत्रिमंडळ विस्तार आणि कोणतेही पद देण्याबाबत आमच्याशी चर्चाच झाली नाही, मात्र यांना कोणतीही किंमत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लालूप्रसाद यादव यांनी हिंदीमधील काही शालजोडीतल्या म्हणी वापरतही नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे.

loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…
shrikant shinde uddhav thackeray omar abdullah
“ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा”, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना’त्या’ विधानावरून टोला!

नितीशकुमार यांना बिहारमध्ये काँग्रेस पक्ष फोडायचा आहे, त्याची सुरूवात त्यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्यापासून केली. आता भाजपवर जदयूचा विश्वास उरलेला नाही आणि जदयूला भाजपवर विश्वास उरलेला नाही. अशात आता नितीशकुमारांना भीती वाटते आहे की त्यांचा पक्ष फुटेल. नितीशकुमार दोन नावेत पाय ठेवून प्रवास करत आहेत, त्यांनी चलाखी करून भाजपसोबत हातमिळवणी केली खरी मात्र ते आता आपल्याच चक्रव्युहात फसले आहेत अशीही टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

नितीशकुमार हे सातत्याने भूमिका बदलतात, त्याचमुळे तोंडावर पडतात. भाजपसोबत जाऊन त्यांनी स्वतःचे नुकसानच करून घेतले आहे. महाआघाडीत असताना नितीशकुमार यांना जी किंमत होती ती आता तिथे म्हणजे एनडीएत गेल्यावर कधीही मिळणार नाही असेही लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले आहे.