News Flash

पंतप्रधान कार्यालयाकडून ‘खादी-चित्रा’चे समर्थन

पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर

खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवर महात्मा गांधीजींच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकल्याप्रकरणी मोदी यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच पंतप्रधान कार्यालयाने मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. या प्रकरणावरून निर्माण झालेला वाद अनावश्यक असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

खादी ग्रामोद्योगच्या दिनदíशका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्या जागी मोदींचे छायाचित्र झळकले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या कृत्यावर टीका करताना हा मंगळयान परिणाम असल्याचे म्हटले. देशासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले मंगळयान मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर त्याचे श्रेय पंतप्रधानांनी घेतले होते. तसाच हा प्रकार असल्याची टीका राहुल यांनी केली. तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खादी आणि गांधीजी हे आपला इतिहास, आत्मसन्मान आणि संघर्ष यांचे प्रतीक आहे. गांधीजींचे छायाचित्र हटवणे हे पाप आहे, अशी टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर तोंडसुख घेताना गांधीजी राष्ट्रपिता होते, मोदी कोण आहेत, असा सवाल केला.

पंतप्रधान कार्यालयाचे उत्तर

  • हा अनावश्यक वाद आहे. खादी ग्रामोद्योगाच्या दिनदíशका आणि रोजनिशींवर गांधीजींचेच छायाचित्र असावे, असा कोणताही नियम नाही.
  • १९९६, २००२, २००५, २०११, २०१२, २०१३ आणि २०१६ या वर्षी दिनदर्शिका आणि रोजनिशींवर गांधीजींचे छायाचित्र नव्हते.
  • काँग्रेसच्या पाच दशकांच्या कार्यकाळात खादीची विक्री दोन ते सात टक्केच झाली. तर मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर खादीच्या विक्रीत ३४ टक्के वाढ झाली आहे.
  • मोदी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खादी परिधान करतात, त्यामुळे खादीचाही प्रसार होतो.
  • खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका व रोजनिशींमध्ये मोदी गरिबांना चरख्यांचे वाटप करीत असल्याची छायाचित्रेही आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:41 am

Web Title: pm narendra modi in mahatma gandhi out on khadi calendar government defends it
Next Stories
1 शिक्षण संस्थांच्या मदतीने ग्रामविकास
2 एअर इंडियात सॉफ्टवेअर खरेदीत घोटाळा, अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल
3 घुसखोरीचा प्रयत्न उधळला, बीएसएफच्या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X