देशाच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आज सर्वत्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तिहेरी तलाक, कलम 370, देशातील गरीबी, देशाची अर्थव्यवस्था, दहशतवाद अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच दहशतवाद पसवणाऱ्यांना शिक्षा ही होणारचं असं सांगत पंतप्रधानांनी पाकिस्तानचं नाव न घेता त्यांना इशारा दिला. दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची घोषणा त्यांनी यावेळी केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात येणार आहे. ते तिन्ही सुरक्षा दलांच्या प्रमुखांवरील प्रभारी म्हणून काम पाहणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

देशातील भ्रष्टाचारासारख्या गंभीर प्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. भ्रष्टाचार, घराणेशाहीने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. भ्रष्टाचार हटवण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम करण्याची गरज असून तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

 

Live Blog

09:04 (IST)15 Aug 2019
किमान 15 पर्यटन स्थळांना भेटी द्या - मोदी

न थकना है, न थमना है न रूकना है या प्रमाणे काम सुरू ठेवणं आवश्यक आहे. 2022 पर्यंत देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत.


08:53 (IST)15 Aug 2019
प्लास्टीकमुक्तीसाठी अभियान सुरू करण्याची गरज

प्लास्टीकमुक्तीसाठी अभियान सुरू करण्याची गरज आहे. सर्व दुकानदारांनी प्लास्टीक पिशव्या देण्यात येणार नाहीत याची माहिती दुकानाबाहेर लावावी. मेड इन इंडिया या वस्तूंना आपण प्राथमिकता दिली पाहिजे. 

08:48 (IST)15 Aug 2019
चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ हे पद अस्तित्त्वात येणार

चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची घोषणा. हे पद तिन्ही दलांच्या वर काम करणारं असणार आहे.

08:44 (IST)15 Aug 2019
दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश - मोदी

दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसारख्या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे.

08:43 (IST)15 Aug 2019
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढा

आम्ही महागाई नियंत्रणात आणली, तसेच विकासदरदेखील कायम ठेवला आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत. संपत्ती निर्मिती देशाच्या विकासाठी आवश्यक आहे. तसेच संपत्ती निर्मिती करणारेदेखील या देशाची संपत्ती आहेत.

08:40 (IST)15 Aug 2019
स्थिर सरकार स्थिर प्रशासन असेल तर जग विश्वास ठेवतं

लघु उद्योजकांची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे. स्थिर सरकार स्थिर प्रशासन असेल तर जग विश्वास ठेवतं. मध्यमवर्गीय लोकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सुविधा दिल्या पाहिजेत. देशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न होणं आवश्यक आहे. 

08:36 (IST)15 Aug 2019
आधुनिक पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची आवश्यकता

गेल्या 70 वर्षांमध्ये अर्थव्यवस्था केवळ 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली. आता अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही अर्थव्यवस्थेला 3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवली. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रूपयांची आवश्यकता.

08:30 (IST)15 Aug 2019
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास कटिबद्ध

सरकारी कामं लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकांच्या अपेक्षा वर्षानुवर्ष वाढत राहणार आहेत आणि त्यादेखील पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. व्यवसाय सुलभीकरणाचेही आम्ही प्रयत्न करत आहोत.

08:27 (IST)15 Aug 2019
साथीदार म्हणून पाठीशी राहा

साथीदार म्हणून सरकारच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ना सरकार का दबाव हो ना सरकार का अभाव हो अशा पद्धतीने काम होणं आवश्यक. गेल्या पाच वर्षांमध्ये  रोज एक कायदा कमी केला. जुन्या कालबाह्य कायद्यांना हद्दपार केलं. 

08:22 (IST)15 Aug 2019
भ्रष्टाचार, घराणेशाहीने देशाचं मोठं नुकसान - पंतप्रधान

भ्रष्टाचार, घराणेशाहीने देशाचं मोठं नुकसान झालं आहे. भ्रष्टाचार हटवण्यासाठी प्रत्येक स्तरावर काम करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आम्ही अनेक बड्या अधिकाऱ्यांना घरी बसवलं.

08:18 (IST)15 Aug 2019
वाढती लोकसंख्या देशापुढील आव्हान - पंतप्रधान

छोटं कुटुंब म्हणजे देशहिताचं कार्य. वाढती लोकसंख्या हे देशापुढील मोठं आव्हान आहे. छोटं कुटुंब ठेवून नागरिकांनी देशाचा विचार केला आहे. छोट्या कुटुंबामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे.

08:15 (IST)15 Aug 2019
एक देश एक निवडणूक संकल्पनेवर विचार व्हावा

जीसएटीमुळे 'वन नेशन, वन टॅक्स' करण्यात आपल्याला यश मिळालं आहे. त्याचप्रमाणे आता देशात एक देश एक निवडणूक यावर विचार करणं आवश्यक आहे.

08:10 (IST)15 Aug 2019
जल जीवन मिशनवर काम करणार

प्रत्येक घरात पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. पाणी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. जल जीवन मिशन घेऊन सरकार काम करणार. जलसिंचन, जल संचय वाढवण्यावर भर देणार. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जल जीवन मिशनवर 3.5 लाख कोटी रूपये खर्च करणार.

08:07 (IST)15 Aug 2019
आता गरीबी हटवण्याची वेळ आली आहे - पंतप्रधान

देशातून गरीबी हटवण्याची वेळ आता आली आहे. देशातील गरीबी हटवण्यासाठी सरकार कटिबद्ध. सर्व गरीबांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार. गरीबी हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

08:06 (IST)15 Aug 2019
जु्न्या व्यवस्थेमुळेच भ्रष्टाचार

जुन्या व्यवस्थेमुळे जम्मू काश्मीर आणि लडाखसारख्या ठिकाणीही भ्रष्टाचार बळावला. 

08:00 (IST)15 Aug 2019
देशाचं हित सर्वप्रथम - मोदी

अनेकांनी कलम 370 रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. कलम 370, कलम 35 ए मुळे जर राज्याचं भाग्य बदलणार होतं तर गेल्या अनेक वर्षांपासून बहुमत असून ते तात्पुरतं का ठेवलं. ती कलमं कायम का केली नाही. जे झालंय ते योग्य झालं नाही याची कल्पना. परंतु ते सुधारण्याची हिंमत नव्हती. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही.

07:58 (IST)15 Aug 2019
तिहेरी तलाकवर कायदा करणं आमची जबाबदारी - मोदी

सती प्रथेविरोधात, स्त्रीभ्रूण हत्येविरोधात आपण कायदा केला. तर तिहेरी तलाकवर कायदा करणं आमची जबाबदारी होती. आपण या अनेक प्रथा बंद केल्या. परंतु तिहेरी तलाक बंद करता आला नाही.

07:55 (IST)15 Aug 2019
केवळ 70 दिवसांमध्ये करून दाखवलं

70 वर्षांमध्ये जे झालं नाही ते या सरकारने 70 दिवसांमध्ये केलं. केंद्र सरकारने कलम 370 हटवून दाखवंल. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला. लोकांनी दिलेलं काम करण्यासाठी आज सत्तेत आलोय.

07:52 (IST)15 Aug 2019
इस्लामिक देशांमध्येही तीन तलाकवर बंदी - मोदी

अनेक देशांनी तीन तलाक प्रथा बंद केली आहे. यामध्ये अनेक इस्लामिक देशांचाही समावेश आहे. आपण अनेक कुप्रथा बंद करू शकतो. तर तीन तलाक प्रथा का बंद करू शकत नाही. यामुळे आपल्या मुस्लीम महिला भगिनींना सर्वांच्या समान हक्क मिळाला. हे राजकारणाशी जोडून पाहू नये.

07:49 (IST)15 Aug 2019
लोकाचा विश्वास प्राप्त करण्यात यश - मोदी

2019 मध्ये देशवासीयांच्या आशा आकांक्षांना नवे बळ मिळाले. लोकांचा विश्वास प्राप्त करण्यात या सरकारला यश मिळाले आहे. सबका साथ सबका विकास यावर सर्व देशवासीयांनी विश्वास दाखवला.

07:47 (IST)15 Aug 2019
देश बदलू शकतो हा विश्वास दिला - मोदी

2014 मध्ये लोकांच्या मनात निराशा होती. परंंतु 2019 मध्ये देशातील नागरिकांच्या मनात आशा निर्माण झाली. आपला देश बदलू शकतो हा विश्वास आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वांच्या मनात निर्माण केला.

07:45 (IST)15 Aug 2019
सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न पूर्ण केलं

सरकारच्या 10 आठवड्यांच्या कालावधीमध्ये काश्मीरमधून कलम 370 आणि 35 अ हटवलं. हे सरदार वल्लभभाई पटेलांचं स्वप्न होतं. ते पूर्ण केलं

07:41 (IST)15 Aug 2019
10 आठवड्यांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले : पंतप्रधान

कलम 370 हटवणं, कलम 35 ए हटवणं, तिहेरी तलाक, दहशतवादाविरोधी लढाई, शेतकऱ्यांसाठी योजना हे केवळ नव्या सरकारच्या सुरूवातीच्या काही काळातच करून दाखवलं.

07:37 (IST)15 Aug 2019
पूरग्रस्तांसाठी मनात संवेदना

आज एकीकडे देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याप्रती संवेंदना व्यक्त करत असल्याचे पतप्रधानांनी सांगितले.

07:31 (IST)15 Aug 2019
पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण

थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी देश परदेशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

07:28 (IST)15 Aug 2019
पंतप्रधानांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर
07:27 (IST)15 Aug 2019
पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिल्या देशवासीयांना शुभेच्छा