गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी यावेळी एकूण 93 मिनिटांचं भाषण केलं. त्यांच्या अन्य भाषणांच्या तुलनेत हे दुसऱ्या क्रमांकाचे जास्त काळ चाललेले भाषण होते. यापूर्वी 2016 मध्ये मोदींनी 94 मिनिटांचं भाषण केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2014 मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांचं भाषण 65 मिनिटे सुरू होतं. त्यानंतर 2015 मध्ये 86 मिनिटे, 2017 मध्ये 56 मिनिटे आणि 2018 मध्ये 65 मिनिटे त्यांनी देशाला संबोधित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी सर्वाधिक वेळ भाषण देण्याचा रेकॉर्ड माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावे होता. त्यांनी 1947 मध्ये त्यांनी 72 मिनिटे भाषण देत देशाला संबोधित केलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्टला त्यांच्या कार्यकाळादरम्यान सरासरी 30 ते 35 मिनिटे भाषण केलं होतं. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरासरी 30 ते 35 मिनिटांचे भाषण केलं आहे.

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रक्षबंधाच्याही शुभेच्छा दिल्या. तसते कलम 370, तीन तलाक, विकास आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी चांगलंच धारेवर धरलं.