पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे थेट संवाद साधला. परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं रहावं याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. सलग तिसऱ्या वर्षी मोदी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे संवाद साधला. दरम्यान, देशभरातील विविध शाळांमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडिअम येथून पंतप्रधानांनी सर्वांशी थेट संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात हा संवादाचा कार्यक्रम पार पडला.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होत असलेल्या तणाव हा परीक्षेचा तणाव नाही. तुमच्या मनात एक आकांक्षा असते की मला काही तरी बनायचंय त्यासाठी ही परीक्षा महत्वाची आहे. जर मी यात अयशस्वी झालो तर माझ्यासाठी पुढील दरवाजे बंद होतील, याचाच प्रामुख्याने तुम्हाला ताण असतो. आपण कधीही काहीतरी व्हायचं स्पप्न बाळगू नका, तर काहीतरी करण्याचं स्वप्न बाळगा. तेव्हाच तुम्ही जे काही कराल ते चांगलंय कराल. जर असा तुमचा दृष्टीकोन राहिला तर तुम्हाला कधीही परीक्षांचा तणाव येणार नाही. त्यामुळे इतर अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली असतील.
आपला आत्मविश्वास इतका तगडा पाहिजे की, आयुष्यभर आपण विद्यार्थी म्हणून जगलं पाहिजे. जीवन जगण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
जर तुम्ही तणाव घेऊन परीक्षा केंद्रावर गेलात तर योग्य होणार नाही. पूर्ण आत्मविश्वासानंच तुम्ही परीक्षा द्यायला हवी. परीक्षेला जीवनात कधीही ओझं होऊ देऊ नका. आत्मविश्वासानं त्याला सामोरं जा.
दिवसभर थकल्यानंतर जर रात्री जागून तुम्ही अभ्यासासाठी बसला तर तुमचे मन स्थिर राहणार नाही. मात्र, चांगली झोप घेतल्यानंतर तुम्ही सुर्वोदयापूर्वी तयार होऊन अभ्यासासाठी बसलात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र, तुम्ही रात्री किंवा सकाळी अभ्यास करता हे महत्वाचं नाही. उलट आपल्याला ज्या वेळेत योग्य वाटतं त्या वेळेत अभ्यास करावा.
पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याची एखादा विषय शिकण्याची किती क्षमता आहे हे तपासायला हवं. लहान असताना आपण मुलांना ज्या प्रेमाने प्रोत्साहित करीत गोष्टी शिकवत होतो. तशाच प्रकारे मुलं मोठी झाल्यानंतरही त्यांना त्याचप्रमाणे प्रेरीत करीत रहा. याला शेवटपर्यंत सोडू नका. पालकांनी किंवा शिक्षकांनी मुलांवर दबाव न टाकता प्रोत्साहीत केलं पाहिजे.
आपल्या कर्तव्यातच सर्वाचे अधिकार समाविष्ट आहेत. जर मी शिक्षक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतो तर विद्यार्थ्यांच्या अधिकारांचे संरक्षण होते. महात्मा गांधी म्हणायचे की मुलभूत अधिकार नव्हते तर मूलभूत कर्तव्ये असतात. देशासाठी देखील आपली काही कर्तव्य आहेत. जसे २०२२मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर २०४७ स्वातंत्र्याचे शंभरावे वर्ष असेल. या काळात आपल्याकडे जर डळमळलेली व्यवस्था असेल तर चालेल का?
तंत्रज्ञानाला स्वतःच्या जीवनाचा भाग होऊ देऊ नका. दिवसातून एक तास तरी तुम्ही तंत्रज्ञनापासून दूर रहायला हवं. घरातील एक खोली अशी करावी ज्यात तंत्रज्ञानाला नो एन्ट्री असावी. त्या खोलीत जो कोणी येईल त्याने सर्व तांत्रिक गोष्टी बाहेर ठेऊनच यावं.
कदाचित गेल्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्वच बदलून टाकले आहे. आज तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाचे भय बाळगता कामा नये. तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे. तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल याचा विचार आपण केला पाहीजे. या तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये. आज आपण जितका काळ स्मार्टफोनवर असतो, त्यांच्यापैकी १० मिनिटं आपण आपल्या आजी-आजोबांसाठी देखील देता आला पाहिजे. ऐकेकाळी सोशल नेटवर्किंग महत्वाचं मानलं जात होतं. पूर्वी आपल्या मित्र-मैत्रीणींना वाढदिवसासाठी भेट देत होतो आता आपण सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देतो. आपण तंत्रज्ञानाचा वापर जरुर करावा पण स्वतःला गुलाम बनवून घेता कामा नये.
आज तुमच्याकडे अनेक संधी आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. मात्र, तुम्ही इतर अॅक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. आजकल पालकांसाठी अशा अॅक्टिव्हिटी फॅशन बनली आहे. विद्यार्थ्यांचा रस कशात आहे हे ओळखून पालकांनी त्याला त्याच कामासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पण अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी करणे गरजेचे आहे. जर आपण शाळेच्या जीवनातच विविधता पूर्ण जीवनाचा आनंद घेता त्याचा पुढील जीवनात तुम्हाला खूपच फायदा होतो. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी तर इतर अॅक्टिव्हिटी केल्याच पाहीजेत त्यामुळे तुमचा ताण हलका होईल.
मोदी म्हणाले, चांद्रयान-२ च्यावेळी आपण सर्वजण रात्रभर जागला होता. आपल्याला असं वाटतं होतं की, आपणचं ही मोहिम पार पाडत आहात. जेव्हा ही मोहिम यशस्वी होऊ शकली नाही तेव्हा संपूर्ण देश निराश झाला होता. सर्वजण रात्री जागत होते. कधी-कधी अपयश आपल्याला असं काही करण्यास भाग पाडते. लोकांनी मला तिकडे जाऊ नका असा सल्ला दिला होता. पण जेव्हा मोहिम अयशस्वी झाल्याचे मला कळाले तेव्हा मला रहावले नाही आणि मी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी आपला कार्यक्रम बदलला. त्यानंतर मी त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले त्यानंतर संपूर्ण देशाचे वातावरण बदलून गेले.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-interacted-with-school-students-during-pariksha-pe-charcha-given-example-of-chandrayaan-2-dmp-82-2064615/
सन २००१मध्ये झालेला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना तुम्हाला आठवतो का? या सामन्यात राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी ज्या पद्धतीने खेळाची बाजी पलटली इतकेच नव्हे तर त्यांनी सामना जिंकला होता. सुरुवातीला संपूर्ण वातावरण नकारात्मक होतं. मात्र, त्यांचा सकारात्मकतेने हे शक्य केलं. एकदा भारताचा संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर गेला त्यावेळी अनिल कुंबळे गोलंदाजी करु शकेल की नाही असे वाटत होते. मात्र, त्यावेळी कुंबळेने ब्रायन लाराची विकेट घेत संपूर्ण सामना बदलवला, अशा प्रकारे आपण स्वतःलाच प्रेरणा देऊ शकतो.
प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरू शकतो. तसेच कोणत्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर त्याचा अर्थ आपण यशाच्या दिशेने निघालो आहोत. त्यानंतर कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला कोणीही यातून बाहेर काढू शकत नाही.
याला बाहेरच्या परिस्थिती जास्त जबाबदार असते. आपले मन स्थिर नसते त्याच वेळेस घरात अभ्यास करण्यास सांगण्यात येते त्यावेळेस आपला मूड ऑफ होतो. त्यासाठी मन एकाग्र करणे गरजेचे आहे.