25 January 2021

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत कारण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कारण सांगितलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत. कारण त्यांनी केलेलं एक नवं ट्विट समोर आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ते असं का म्हणाले त्याचं कारण आता समोर आलं आहे.

#SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

आज ट्विटमध्ये काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?

या महिला दिनाच्या दिवशी माझी सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करण्याच्या दृष्टीने विचार करतो आहे. महिला या जगाला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेरणा ठरलेल्या महिलांचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आणि त्यासोबत #SheInspiresUs हा हॅशटॅग जोडायचा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

त्या व्हिडीओजमधल्या निवडक व्हिडीओंमधील महिलांना नरेंद्र मोदी यांची सोशल मीडिया अकाऊंट्स ऑपरेट करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भातलं ट्विट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 1:57 pm

Web Title: pm narendra modi is not going to leave all social media accounts this the reason scj 81
Next Stories
1 BS6 इंजिनसह नव्या अवतारात आली Jawa, किंमतही बदलली
2 Realme : 48 मेगापिक्सलसह 4 कॅमेरा असलेल्या फोनवर डिस्काउंट, मिळेल दमदार बॅटरी
3 गेमर्ससाठी संधी! POCO X2 स्मार्टफोनचा आज सेल, ‘या’ आहेत ऑफर
Just Now!
X