03 March 2021

News Flash

देशाला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

५० वर्षांत जे काम झाले नाही. ते काम आमच्या सरकारने सुरू केले आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो सौजन्य- ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मदुराई येथील एम्सचा (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) शिलान्यास केला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्याचबरोबर आपल्या दौऱ्यास विरोध करणाऱ्या विरोधकांच्या हेतूवरही सवाल उपस्थित केला. देशातील भ्रष्टाचार आणि नातेसंबंधातून सुटका करण्यासाठी प्रभावी पाऊल उचलले जात आहेत. देशाला धोका देणाऱ्या किंवा लुटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही. ५० वर्षांत जे काम झाले नाही. ते काम आमच्या सरकारने सुरू केले आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

आपल्या दौऱ्याचा विरोध करत असलेल्या पक्षांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी तामिळनाडूमध्ये संशयाचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहेत. सर्व नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही सतर्क राहा, असे मी आवाहन करतो.

यावेळी त्यांनी आर्थिकदृष्ट्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्यावरुन ते म्हणाले की, सर्वांनाच विकासाचा फायदा मिळावा हा आमचा उद्देश आहे. केंद्र सरकार समाजातील सर्व वर्गांतील शिक्षण, रोजगाराची संधी देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. या भावनेनेच आम्ही सामान्य वर्गातील गरीब लोकांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुमारे २०० एकर परिसरात १५०० कोटी रूपये गुंतवून मदुराई येथे एम्स रूग्णालय उभारले जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा जागोजागी विरोध करण्यात आला. मदुराई येथे एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी आंदोलन केले. अनेक ठिकाणी ‘मोदी गो बॅक’ चे नारे देण्यात येते होते. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 3:25 pm

Web Title: pm narendra modi lay foundation stone of aiims in madurai tamilnadu slams on congress
Next Stories
1 चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची दुसऱ्याच दिवशी बदली
2 ‘नारी शक्ति’ला नवी ओळख, ऑक्सफर्डने निवडला वर्ड ऑफ द इयर
3 स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा – मोदी
Just Now!
X