26 January 2021

News Flash

“जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना…” मोदींनी प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

बेजबाबदारपणा वाढल्याची खंतही मोदींनी केली व्यक्त

देशात आता अनलॉक-२ सुरू होत असल्याच्या पार्शभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी बेजबाबदारपणा वाढल्याची खंतही व्यक्त केली. शिवाय, आता जे लोक नियमांच पालन करणार नाही त्यांच्यासाठी मोदी यांनी खास सूचनाही प्रशासन आणि विविध संस्थांना दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, करोना ही जागतिक साथ आहे. त्याविरोधात लढताना आता आपण अनलॉक २ मघ्ये प्रवेश करत आहोत. पण त्यासोबत आता असा ऋतु आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे अनेक आजार बळावतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याला जबाबदारीनं वागावं लागणार आहे. पण जेव्हापासून अनलॉक १ सुरू झाला तेव्हापासून बेजबाबदारपणा वाढला आहे. अनेक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोवेळी हात धुवायचे. मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजबाबदारपणा वाढल्याचे दिसते.

लॉकडाउनच्या काळात नियमांचं गंभीरतेनं पालन केलं गेलं. आता सरकारी अधिकारी, संस्थांना देशातील नागरिकांना तशाच प्रकारे नियमांचं पालन करून घ्यावं लागणार आहे. लोकांना त्याच जबाबदारीनं वागावं लागणार आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.

कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना टोकावं लागेल. रोखावं लागेल आणि समजून सांगावं लागेल, असंही मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 6:30 pm

Web Title: pm narendra modi live speech today those who not follow rules should alert them pkd 81
Next Stories
1 बोलायचं होतं चीनवर, पण बोलले…; ओवेसींचा मोदींना शालजोडीतला टोला
2 …ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मोदींच्या भाषणावर राहुल गांधींचा अप्रत्यक्ष टोला
3 चीनचा उल्लेखही मोदींनी टाळला
Just Now!
X