News Flash

Narendra Modi at WEF: तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा: पंतप्रधान मोदी

जगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान

दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले.

दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली. १९९७ च्या तुलनेत भारताचा जीडीपीही सहा पटीने वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताने नेहमी वसुधैव कुटुंबकमवर विश्वास ठेवला आहे. याचा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, असे त्यांनी म्हटले.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा हे १९९७ मध्ये दावोसला आले होते. तेव्हा भारताचा जीडीपी हा सुमारे ४ मिलियन डॉलरच्या आसपास होता. दोन दशकानंतर तो आता सुमारे सहापट अधिक आहे. आता आपण नेटवर्क सोसायटी नाही. तर बिग डेटाच्या विश्वात वावरत आहोत. १९९७ मध्ये युरो चलन नव्हते. त्यावेळी ब्रेक्झिटची चिन्हेही नव्हती. त्यावेळी खूप कमी लोकांनी ओसामा बिन लादेनचे नाव आणि हॅरी पॉटरचे नाव ऐकले होते. त्यावेळी बुद्धिबळ खेळणाऱ्या खेळाडूंना कॉम्प्यूटरबरोबर पराभूत होण्याचा धोका नव्हता. त्यावेळी गुगलचा शोधही लागला नव्हता. त्यावेळी जर तुम्ही अॅमेझॉनचे नाव इंटरनेटवर शोधले असते तर तुम्हाला नदी किंवा पक्षांचे नाव सापडले असते. ट्विट करण्याचे काम पक्ष पक्षीच करत असत.

दावोस त्यावेळी इतर सर्वांपेक्षाही पुढे होते आणि आजही आहे. आज आपल्याकडे डेटा खूप आहे. डेटाचा पर्वत बनत आहे. त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. आता म्हटलं जातं की, जो डेटावर नियंत्रण ठेवेल तोच जगात आपले वर्चस्व कायम राखेल. आज वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणारे आव्हान अधिक गंभीर होताना दिसत आहे.

यावेळी त्यांनी लोकशाहीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही भारतीय आपल्या लोकशाही आणि विविधतेवर अभिमान बाळगतो. धार्मिक, सांस्कृतिक, विविध भाषा आणि विविध प्रकारच्या समाजासाठी लोकशाही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही तर एक जीवनशैली असल्याचे ते म्हणाले. ७० वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात एकीकृत कर व्यवस्था लागू करण्यात आली. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 4:22 pm

Web Title: pm narendra modi lives speaks in davos in world economics forum plenary session
Next Stories
1 लोकसभा निवडणुकीपूर्वी आरएसएसमध्येही होणार मोठे बदल, युवकांना मिळणार संधी
2 हादियाचे सक्तीने धर्मांतर झाले का ते शोधा?, विवाहाचा संबंध नाही: सुप्रीम कोर्ट
3 …मग सरकार सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय कशाला घेते; उद्धव ठाकरेंचा गडकरींना सवाल
Just Now!
X