News Flash

VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पायऱ्यांवर अचानक तोल गेला आणि….

सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावरलं, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कानपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गंगा घाटाला भेट दिली. यावेळी पायऱ्या चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले. त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरलं. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील नमामी गंगा प्रकल्पाची पाहणी केली. त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगेच्या किनाऱ्यावर अटल घाट या ठिकाणी पायऱ्यांवरुन जात होते. त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि अडखळून पडले. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरलं. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 9:26 pm

Web Title: pm narendra modi lost balance ganga ghat kanpur scj 81
Next Stories
1 “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जाहीररित्या जोडे मारावेत”
2 १०० जन्म घेतले तरीही राहुल गांधींना ‘सावरकर’ होता येणार नाही-भाजपा
3 ‘एका गोळीने आम्हा नऊ जणांना संपवलं’, डान्स थांबवला म्हणून तिच्या चेहऱ्यावर झाडली होती गोळी
Just Now!
X