पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी ११ वाजता, ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचा हा ६८ वा भाग होता. या भागात मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं. “पोषण (न्यूट्रिशन) याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहोत, किती खात आहोत, किती वेळा खात आहोत. पोषण याचा खरा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे हा असतो. आपल्यात एक म्हण आहे ‘यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी आज, ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं? त्याची nutrition value किती? याची सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय मोदी यांनी आपल्या संबोधनात, लहान मुलांसाठी तयार करण्यात येणारी खेळणी जास्तीत जास्त प्रमाणावर स्वदेशी बनावटीची असावीत असं मत व्यक्त केलं. तसे झाल्यास भविष्यात भारत देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ajit pawar
VIDEO : “माझा रेकॉर्ड…”, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “सहा वेळा उपमुख्यमंत्री व्हायला…”
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Why Nitin Gadkari said If BJP government comes will some be sent to Pakistan in front of Prime Minister Narendra Modi
“भाजपाचे सरकार आले तर काहींना पाकिस्तानात पाठवले जाईल?” नितीन गडकरी याबाबत पंतप्रधान मोदींसमोर काय म्हणाले? वाचा…
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

जाणून घ्या आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातील काही महत्त्वाच्या गोष्टी-

Live Blog

12:21 (IST)30 Aug 2020
'मन की बात'मध्ये भेटू.. - मोदी

सोशल डिस्टन्सिंग पाळाल, मास्कचा वापर नियमित कराल तेव्हाच तुम्ही करोनापासून सुरक्षित राहाल. तुम्ही सर्वजण निरोगी राहा, आनंदी राहा.. या शुभेच्छांसह पुन्हा 'मन की बात'मध्ये भेटू...

12:16 (IST)30 Aug 2020
शिक्षकांबद्दल आभिमान - मोदी

पाच सप्टेंबर रोजी आपण देशभरात शिक्षक दिवस साजरा करणार आहोत. आपण आपल्या आय़ुष्यातील यश आणि जीवन यात्रा पाहिल्यास कोणत्या ना कोणत्या शिक्षकाची आठवण येतेच . वेगानं बदलणाऱ्या काळ आणि करोना संकटात शिक्षकांनाही स्वत:मध्ये बदल करण्याचं एक आव्हान आहे. मला आनंद आहे की शिक्षकांनी या आव्हानाला स्विकार केलं नाही तर त्याला एक संधी म्हणून घेतलं. आज देशात काही नाविन्यपूर्ण घटना घडत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र काहीतरी नवीन करत आहेत. मला खात्री आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे देश मोठा बदल घडवून आणणार आहे आणि याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यास आमचे शिक्षक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

12:13 (IST)30 Aug 2020
Indian breed चेच श्नान घ्या

श्वानाची Disaster Management आणि Rescue Missions मध्येही महत्वाची भूमिका आहे. भारतात तर National Disaster Response Force – NDRF ने असे डजनभर श्वानला ट्रेनिंग दिलं आहे. "राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई, आणि कोम्बाई यासारखे भारतीय जातीचे चांगले श्वान आहेत. भारतीय जातीचे श्वानही उत्कृष्ट आणि सक्षम असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. भारतीय श्वानामध्ये (Indian Breeds ) मुधोल हाउंड आणि हिमाचली हाउंड हेही उत्कृष्ट दर्जाचे श्वान आहेत. गेल्या काही दिवसांपासून @adgpi,@CISFHQrs आणि @nsgblackcats यांनी मुधोल हाउंड श्वानाला ट्रेन करुन dog squad मध्ये सामाविष्ट केलं आहे. @crpfindia ने कोम्बाई dogs ला सामाविष्ट केलं आहे. Indian Council of Agriculture Research भारतीय जातीच्या श्नावार संशोधन करत आहेत. तुम्ही घरात पाळण्यासाठी श्नान घ्यायला गेल्यानंतर Indian breed चेच श्नान घ्या.

12:13 (IST)30 Aug 2020
Indian breed च्या श्वानाबद्दल मोदी यांनी दिली माहिती

सोफी आणि विदा, Indian Army च्या श्वानाला Chief of Army Staff ‘Commendation Cards’ ने सम्मानित करण्यात आलं आहे. आपल्या लष्करात, सैन्यात आणि विविध सुरक्षा बलांमध्ये असे अनेक बहाद्दुर श्वान आहे. जे देशांसाठी आपलं बलिदान देतात. अनेक बॉम्ब स्फोट, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी त्यांनी मोठी आणि महत्वाची भूमिका पार पाडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मला देशाच्या सुरक्षामध्ये श्वानाच्या भूमिकाबद्दल सविस्तार माहिती जाणून घ्यायला मिळली. गेल्या काही दिवासांपूर्वी बीड पोलिस आपला सहकारी रॉकी शॉनला सन्मानपूर्वीक निरोप देतानाचा व्हिडीओ तुम्ही पाहिली असेल. रॉकीने ३०० पेक्षा जास्त केसेस सोडवण्यासाठी पोलिसांची मदत केली होती. भूकंप किंवा इमारत पडल्यानंतर जमा झालेल्या मलब्यातून जिवंत लोकांना शोधण्यात श्वान तरबेज असतात. 

11:52 (IST)30 Aug 2020
भारतीय कृषी कोष तयार करण्यात येणार - मोदी

"एक “भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येत आहे. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं त्याची nutrition value किती आहे. याची सर्व माहिती दिली जाणार आहे. हा कोष तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल.

11:49 (IST)30 Aug 2020
Quiz alert!

पोषण महिन्यात MyGov portal वर एक food and nutrition quiz चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मीम्स competition भी करण्यात येणार आहे. तुम्ही स्वत: यात सहभागी होऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना सहभागी होण्यास प्रेरित करु शकता....

11:47 (IST)30 Aug 2020
सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल

सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल. राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. आपल्यात एक म्हण आहे - ' यथा अन्नम तथा मन्नम' म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा आपण खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे

11:41 (IST)30 Aug 2020
Lets Game begin

भारताकडे मोठी परंपरा, संस्कृती असताना खेळण्याच्या बाजारात भारताचा वाटा फारच कमी आहे. पूर्ण आत्मविश्वासने आपल्याला देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. भारताने पर्यावरणाला पुरक ठरतील अशी खेळणी तयार करायला हवीत. कम्प्युटर गेममध्ये देखील परदेशी थीम असण्यापेक्षा भारतातीलच थीम असायला पाहिजेत. आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक संकल्पना आहेत, आपल्याकडे खूप समृद्ध इतिहास आहे. आम्ही त्यांच्यावर खेळ करू शकतो का ? देशातील तरुणांनी देशातच देशाची खेळणी तयार करावीत... चला खेळ सुरू करूनया... Lets Game begin

11:36 (IST)30 Aug 2020
best Toy तो असतो जो Incomplete - मोदी

भारतात मुलांना विविध प्रकारची खेळणी कशी मिळतील यावर आम्ही विचार केला. तसेच मोठ्या प्रमाणात देशात मुलांची खेळण्यांची कशी निर्मीती करता येईल यावर विचार घेतले. विशेष करुन भारतीय खेळणी कशी तयार करता येतील यावर विचार झाला. मन की बात ऐकणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची मी क्षमा मागतो. कारण, मन की बात ऐकल्यानंतर तुमच्याकडे खेळण्याची नवीन मागणी येईल आणि तुम्हाला कामही लागेल. मित्रांनो, खेळणी मुलांचं activity वाढवण्याचं काम करण्याबरोबरच आकांक्षाही वाढवते. खेळण्यामुळे मुलं व्यस्तच होत नाहीत तर त्यांना भविष्यातील दिक्षाही दाखवते. मी कुठेतरी वाचलेय खेळण्याबाबत रविंद्रनाथ टागौर म्हणालेत की best Toy तो असतो जो Incomplete आहे. असं खेळणं जे अपुर्ण आहे आणि लहान मुलं खेळताना त्याला पुर्ण करतात.

11:26 (IST)30 Aug 2020
लहनग्यांसाठीही मोदींची योजना

करोना संकटात देशातील नागरिक एकत्र होऊन लढत आहेत. पण यासोबतच माझ्या मनात एक विचार आला की, इतक्या दिवसांपासून माझे बालमित्र आपला वेळ कसा घालवत असतील. या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच, मी गांधीनगर येथील Children University ( जगभरात विविध प्रयोगासाठी नावाजली आहे.) आणि भारत सरकराच्या @MinistryWCD, @EduMinOfIndia,@minmsme या सर्वांसोबत मिळून लहान मुलांसाठी काय करता येईल यावर विचार केला आहे.

11:22 (IST)30 Aug 2020
देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींचे नमन.

मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील शेतकऱ्यांना मोदी यांनी नमन केलं. ते म्हणाले की, शेतकऱ्यांमुळेच आपलं जीवन आणि समाज चालतोय. त्यांच्या कष्टामुळे आपलं जीवन रंग-बिरंगी होतेय. "अन्नानां पतये नमः, क्षेत्राणाम पतये नमः अर्थात, अन्नदाताला प्रणाम, शेतकऱ्याला प्रणाम.. आपल्या देशात यंदा खरीपाची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्क्यांनी जास्त झाली आहे. यासाठी मी देशातील शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कष्टापुढे नतमस्तक होतो.....

11:17 (IST)30 Aug 2020
पर्व आणि पर्यावरणात अतूट नातं - मोदी

पर्व आणि पर्यावरणामध्ये अतूट असं नातं असल्याचं आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं. प्रकृतीच्या रक्षाणासाठी थारु समाजाने अनेक वर्षांपासून आपला एक भाग बनवला आहे. बिहारमधील पश्चिमेकडील चंपारण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून थारु आदिवासी समाजाचे लोक ६० तासाच्या लॉकडाउनचं(आदिवाशी समजाच्या भाषेत बारना म्हटलं जातं) पालन करतात. बरनाच्या सुरुवातीला आपले आदिवासी भाऊ-बहीण पूजा-पाठ करतात. त्यानंतर त्याच्या सम्पातीवर परंपरेनुसार गीत, संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम होतो.

11:11 (IST)30 Aug 2020
नागरिकांचं कौतुक

देशात आयोजित करण्यात आलेल्या सण आणि उत्सवाला पाहून मन भरत आहे. हे सर्व अभूतपूर्व आहे. गर्दी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी गणेशोत्सव ऑनलाइन साजरा केला जात आहे. देशातील अनेक नागरिकांनी इकोफ्रेंडली गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे.

11:08 (IST)30 Aug 2020
नागरिक कर्तव्याचं पालन करत आहेत - मोदी

प्रत्येक भारतीय नागिरक आपल्या कर्तव्याचं पालन करताना दिसत आहे. लोक स्वत:ची काळजी घेण्याबरोबर लोकांनाही मदत करत आहेत. आणि दैनंदिन कामही करत आहेत.

11:06 (IST)30 Aug 2020
मन की बात कार्यक्रमाला सुरुवात

"माझ्या प्रिय नागरिकांनो, नमस्कार!

सर्वसाधारणपणे ही वेळ उत्सवाची आहे. प्रत्येक ठिकाणी जत्रा लागते. धार्मिक पूजा पाठ होतात. करोनाच्या या संकटात लोकांमध्ये संयम, उत्साह आणि उमंग आहे. सर्वांनाच भावेल असं अनुशासनही आहे. "

10:20 (IST)30 Aug 2020
११ वाजता तयार राहा
10:18 (IST)30 Aug 2020
मागील मन की बात कार्यक्रमात काय म्हणाले होते.....

गेल्या महिन्यातील मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मास्कमुळे करोनाचा संसर्ग कसा रोखला जाऊ शकतो याबाबद्दल वक्तव्य केलं होतं. तसेच डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि करोना योद्ध्यांवर वक्तव्य केलं होतं.