चीनने भारतीय सैन्यासोबत जी आगळीक केली त्यानंतर भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर चीनविरोधात देशात कमालीचं संतापाचं वातावरण आहे. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या जवानांची विचारपूस केली. लेहमध्ये आज अचानक जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. लडाखमधल्या जवानांचं शौर्य हे हिमालयातल्या पर्वतरागांपेक्षा मोठं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी जखमी जवानांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

आपला देश कोणत्याही जागतिक संकटापुढे झुकलेला नाही, झुकणार नाही. आज मला तुमचा आणि तुमच्या मातांचा अभिमान आहे ज्यांनी तुमच्यासारख्या शूर वीरांना जन्म दिला असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच तुम्ही सगळे लवकर बरे व्हा अशा शुभेच्छाही मोदींनी दिल्या.