03 April 2020

News Flash

हिंमत असेल तर आम्ही ३७० कलम पुन्हा आणू जाहीरनाम्यात लिहून दाखवा, नरेंद्र मोदींचं आव्हान

"३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना दुख: झालं आहे. ते लोक निर्णयावर प्रश्चचिन्ह उपस्थित करत आहेत"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ३७० कलमचा उल्लेख करत विरोधकांना आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर आम्ही ३७० कलम पुन्हा आणू असं लोकांमध्ये जाऊन जाहीरपणे बोलून दाखवा तसंच जाहीरनाम्यात ते लिहा असं थेट आव्हान नरेंद्र मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी हरियाणामील बल्लभगज येथे प्रचारसभा पार पडली. “हरियाणाने आपल्याला खूप काही शिकवलं आहे, यामुळेच मी जेव्हा येथे येतो तेव्हा माझ्या मनात अनेक भावना निर्माम होत असतात. पाच वर्ष तुम्ही आमचा कर्णधार आणि मजबूत संघ पाहिला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष आपला संघ सांभाळण्यात व्यस्त आहेत,” असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी लगावला.

हरियाणात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पहिल्यांदात प्रचारसभा पार पडली. गेल्या निवडणुकीत भाजपाने १६ पैकी सात जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने तीन तर बसपाला फक्त एका जागेवर विजय मिळवला होता.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३७० कलमचा उल्लेख केला. “तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्याचाच परिणाम आहे की, कोणी कल्पनाही करु शकत नाही असे निर्णय सरकार घेत आहे. हरियाणासहित सर्व देशवासियांची भावना होती की, जम्मू काश्मीरला विकासाकडे नेलं पाहिजे. आज जम्मू काश्मीर त्या मार्गावर आहे. याचं श्रेय नरेंद्र मोदींचं नाही, तर १३० कोटी देशवासियांचं आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना दुख: झालं आहे. ते लोक निर्णयावर प्रश्चचिन्ह उपस्थित करत आहेत. परदेशात जाऊ मदत मागत आहेत. त्यांचं जर ३७० कलमवर इतकंच प्रेम आहे, तर मी त्यांना हरियाणामधील लोकांमध्ये जाऊन आपण ३७० आणि ३५ ए पुन्हा आणू असं सांगा असं आव्हान करतो. मोदींनी जे केलं आहे त्याच्या उलट करु. आपल्या जाहीरनाम्यात हे सर्व लिहून दाखवावं. त्यांच्या डोळ्यातील अश्रू खोटे आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

विकास माझी प्राथमिकता
मोदींनी म्हटलं आहे की, “हरियाणाच्या लोकांच्या आयुष्यात बदल करणे आणि विकास माझी प्राथमिकता आहे. मला आठवतं जेव्हा पाच वर्षांपुर्वी मी हरियाणात भाजपा सरकार स्थापन करण्याबद्दल बोलायचो, तेव्हा विरोधी पक्षातील नेते मला तुमचा कर्णधार कोण असणार ? असा प्रश्न विचारायचे. तेव्हा माझं उत्तर असायचं हरियाणाच्या जनतेने आशीर्वाद दिला तर जनतेला एक मजबूत कर्णधार आणि मजबूत संघ मिळणार”.

“जगातील अनेक मोठे नेते भारतासोबत एकत्र येण्यासाठी आतुर आहेत. तुम्ही जो जनादेश दिला आहे त्यामुळे जगासमोर महत्त्वाचा संदेश गेला आहे की, भारतीय एकत्रितपणे विकास आणि विश्वासाच्या धोरणाला पाठिंबा देत असून वेगाने वाटचाल करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 6:55 pm

Web Title: pm narendra modi on jammu kashmir article 370 haryana assembly election sgy 87
Next Stories
1 आश्चर्य! राजस्थानातील महिलेने दिला एकाच वेळी पाच मुलांना जन्म
2 इंधनासाठी उसळली दंगल, सरकारने लादली आणीबाणी
3 मोदींच्या स्वच्छता मोहिमेची चर्चा पण खऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना महिन्याभरापासून पगारच नाही
Just Now!
X