कृषी विधेयकांचा विरोध करणं म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेटवर पंजाब यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून विधेयकांचा विरोध करताना आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर जाळण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेक करताना ज्याची पूजा केली जाते अशा गोष्टींची जाळपोळ करुन शेतकऱ्यांचा अपमान केला जात आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. उत्तराखंडमधील विकास प्रकल्पांचं उद्घाटन करताना ते बोलत होते.

“विरोधक शेतकरी ज्याची पूजा करतात त्या मशीन आणि उपकरणांची जाळपोळ करुन ते शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. गेली कित्येक वर्ष आपण एमएसपी लागू करणार असं आश्वासन दिलं गेलं, पण अमलबजावणी केली नाही. पण आमच्या सरकारने स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार लागू केलं,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

आणखी वाचा- कृषी विधेयकावरुन हिंसक आंदोलन: इंडिया गेटवर पेटवला ट्रॅक्टर

पुढे ते म्हणाले की, “शेतकरी आता कुठेही आणि कोणालाही धान्य विकू शकतो. पण जेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्याला त्यांचे हक्क देत आहे तेव्हा हे लोक त्याला विरोध करत आहेत. शेतकऱ्याने आपलं धान्य खुल्या बाजारात विकू नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यांना नफा कमावण्यासाठी मध्यस्थी हवी आहे. ते शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहेत”.

“आज हे लोक एमएसपीवरुन शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत. देशात फक्त एमएसपी नाही तर शेतकऱ्यांना आपलं धान्य कुठेही विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. पण काही लोकांना हे स्वातंत्र्य पहावत नाहीये. काळा पैसा कमावण्याचा त्यांचा एक मार्ग बंद झाला आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

आणखी वाचा- केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक; काँग्रेसशासित राज्यांना नवीन कायदा करण्याचा सल्ला

“शेतकरी, कामगार तसंच आरोग्य क्षेत्रतील अनेक बदल अधिवेशनात मांडण्यात आले. हे बदल कामगार, तरुण, महिला तसंच देशातील शेतकऱ्यांना मजबूत करतील. पण काही लोक आपल्या फायद्यासाठी कसा विरोध करत आहेत हे देश पाहत आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- भारतातील लोकशाही मेलीये, हा घ्या पुरावा; कृषी कायद्यांवरून राहुल गांधी संतापले

“गेली इतकी वर्ष विरोधकांना आपल्या सुरक्षा दलाला मजबूत करण्यासाठी काही केलं नाही. हवाई दल वारंवार राफेल विमानांची मागणी करत होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण जेव्हा आमच्या सरकारने फ्रान्स सरकारसोबत करार केला तेव्हा मात्र यांना लगेच समस्या जावणू लागली,” असं मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- NDA फक्त नावाला, इतक्या वर्षात पंतप्रधानांनी बैठकही बोलावली नाही – सुखबीर सिंग बादल

पुढे त्यांनी सांगितलं की, “चार वर्षांपूर्वी आपल्या शूर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण विरोधक त्याचे पुरावे मागत होते. सर्जिकल स्ट्राइकला विरोध करुन त्यांनी आपले मनसूबे देशासमोर आणले”.