06 March 2021

News Flash

मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती? सरकार लवकरच निर्णय घेणार; मोदींचं आश्वासन

समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित

संग्रहित

मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे. संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

नरेंद्र मोदींनी सांगितलं की, “मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातील मुलींनी मला अद्यापही संबंधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबद्दल विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वस्त करतो की अहवाल आल्यानंतर लगेचच सरकार त्यावर काम सुरु करेल”. लग्न आणि आई होण्याचं वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींनी यावेली महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. “प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहोचवण्याचं काम सुरु आहे. १ रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केलं जात आहे,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 2:23 pm

Web Title: pm narendra modi says government will decide right age of daughters soon sgy 87
Next Stories
1 दाऊद इब्राहिमची जमीन १.३८ लाखाला विक्रीस; तुम्हीही घेऊ शकता विकत
2 Bihar Elections: मतांच्या टक्केवारीत भाजपाची जोरदार मुसंडी; ठरला एकमेव राष्ट्रीय पक्ष
3 “पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे”; GDP वरुन राहुल यांचा मोदी सरकारवर निशाणा
Just Now!
X