नवी दिल्ली : करोना साथीचा जागतिक मुकाबला करण्यासाठी कोविड लशी पेटंटमुक्त कराव्यात,  असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ बैठकीत बोलताना शनिवारी केले.

रोगाच्या आगामी साथी टाळण्यासाठी जागतिक समुदाय, नेते  यांनी एकजूट दाखवण्याची गरज प्रतिपादन करताना त्यांनी सांगितले, की एक वसुंधरा व  एक (सामुदायिक) आरोग्य ही संकल्पना जागतिक पातळीवर पुढे नेली पाहिजे.

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

त्यांच्या या संकल्पनेला जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑस्ट्रेलिया व इतर अनेक देशांनी करोना लशींवरील पेटंट रद्द करण्याच्या मोदी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. करोना लशी व औषधांवरची पेटंट रद्द करण्याची मागणी दक्षिण आफ्रिका व भारत यांनी जागतिक व्यापार  संघटनेकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जी-७ देशांच्या बैठकीत ‘बिल्डिंग बॅक स्ट्राँगर हेल्थ’ या विषयावर आयोजित सत्रात सांगितले, की साथीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. सरकार, उद्योग व नागरी समुदाय या पातळीवर संयुक्तपणे प्रयत्न केले, तरच आपली ध्येये साध्य करता येतील.

मोदी यांनी सांगितले, की करोना लशींवरचे पेटंट माफ करावे, अशी मागणी भारताने जागतिक व्यापार संघटनेत केली आहे, त्याला जी ७ देशांनी पाठिंबा द्यावा. जागतिक आरोग्य प्रशासन व सुविधा सुधारण्याच्या सामुदायिक प्रयत्नांनी भारत मदत करील. जागतिक व्यापार संघटनेत ट्रिप्स व पेटंट माफ करण्याचे आम्ही जे प्रस्ताव मांडले आहेत ते मंजूर करावेत. ‘एक जग एक आरोग्य’ असाच संदेश आपण आजच्या या जागतिक शिखर बैठकीच्या निमित्ताने देत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

करोना साथीत जी ७ देशांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी आभार मानले. संपर्क शोधासाठी खुल्या स्रोतातील डिजिटल साधनांचा वापर भारताने यशस्वीपणे केला व हा अनुभव इतरांसमवेत वाटून घेण्याची तयारी मोदी यांनी दर्शवली.

जी-७ देशांत ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान व अमेरिका यांचा समावेश असून भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका हे अतिथी देश आहेत. ब्रिटनमधील कॉर्नवॉल येथे ही परिषद  ११ ते १३  जून दरम्यान झाली.

आपण जी- ७ देशांच्या शिखर बैठकीत सहभागी झालो, त्यात आरोग्याविषयी विचार मांडले. करोना साथीच्या काळात ज्यांनी मदत केली त्या सर्वाचे आभार मानले. आगामी काळात अशा साथी रोखण्यासाठी ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ हाच आमचा मूलमंत्र आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान