News Flash

मोदी आणि शहांना अटक करा- ममता बॅनर्जी

आमच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर आम्ही शांत बसू, असा मोदींचा समज असेल तर तो चूक आहे.

PM Narendra Modi : सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सुदीप बंडोपाध्याय यांना रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी अटक केली.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमुल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय राजकारणातील काहीदेखील कळत नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, असे ममता यांनी म्हटले.
सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते आणि ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सुदीप बंडोपाध्याय यांना रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी अटक केली. आमच्या नेत्यांना अटक झाल्यानंतर आम्ही शांत बसू, असा मोदींचा समज असेल तर तो चूक आहे. आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढू आणि न्यायालयाकडे दाद मागू, असे ममता यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचा आवाज दाबू शकत नाहीत. अनेक राजकीय पक्ष घाबरत असल्यामुळे काही बोलत नाहीत. ही आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, अशी टीकाही यावेळी बॅनर्जी यांनी केली.

दरम्यान, बंडोपाध्याय यांच्या अटकेनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने आपातकालीन बैठक बोलविली आहे. रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सुदीप बंडोपाध्याय आणि पक्षाचे खासदार तपस पाल यांना सीबीआयने समन्स पाठवले होते. चौकशीनंतर सीबीआयने पाल यांना ३० डिसेंबरला अटक केली होती. त्यानंतर त्यांना भुवनेश्वरच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली होती. दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर संतापलेल्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने भाजपच्या कार्यालायावर हल्ला केला. त्यामुळे सध्या कोलकातामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 6:00 pm

Web Title: pm narendra modi should be arrested will seek justice in court mamata banerjee on sudip bandyopadhyay arrest
Next Stories
1 महाविद्यालयांमध्ये अपंगांसाठी पाच टक्के राखीव कोटा?
2 कोलकात्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भाजप कार्यालयावर हल्ला
3 दहशतवादी बुरहान वानी शहीद!; जम्मू-काश्मीरच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
Just Now!
X