19 January 2019

News Flash

मोदींनी बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे: राहुल गांधी

कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिला अत्याचारांविरोधात मोर्चे निघत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.

राहुल गांधी ( संग्रहीत )

देशाच्या मुलींना न्याय मिळवून देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गंभीर असतील तर त्यांनी लहान मुलींवरील बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिला अत्याचारांविरोधात मोर्चे निघत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विटरवरुन केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. ‘देशात २०१६ मध्ये वर्षभरात लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे १९, ६७४ गुन्हे दाखल झाले होते. हा देशासाठी लाजिरवाणा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गंभीर असतील तर बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोषींना न्याय मिळवून द्यावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील कठुआ व बलात्कार प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली होती. गेल्या आठवड्यात दिल्लीतील इंडिया गेट येथे मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहित काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

First Published on April 16, 2018 6:40 pm

Web Title: pm narendra modi should fast track rape cases demands congress president rahul gandhi