तुम्ही पाच मिनिट एका जागी उभं राहून मोदींना सन्मानित करा अशा प्रकारची एक मोहीम सुरू केल्याचं माझ्या ध्यानात आणून दिलं आहे. जर माझ्यावर प्रेम असेल तर हे करण्यापेक्षा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असे पर्यंत त्यांनी एका कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका जागी पाच मिनिटं उभं राहून मोदींना सन्मानित करा अशी मोहीम सुरू असल्याचं माझ्या ध्यानात आणून दिलं आहे. याकडे पाहिलं तर सुरूवातीला मोदींना वादात ढकलण्यासाठी हे सुरू केलं आहे असं वाटतं. यामागे कोणाचा चांगला हेतूही असू शकतो. तर त्यांना माझीही एक विनंती आहे. जर कोणी मोदींना सन्मानित करू इच्छित आहे आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे तर करोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत एका गरीब कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. माझ्यासाठी यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नसेल, असं मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान, भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७०० पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ च्या वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi take responsibility of one poor family till coronavirus gets over if you love respect me jud
First published on: 08-04-2020 at 17:29 IST