09 August 2020

News Flash

भारतीय नागरिकत्व मिळणाऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल – पंतप्रधान

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेमध्ये विकासाची आशा पल्लवित झाली, असेही ते म्हणाले.

| December 7, 2019 02:43 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात ज्या बिगर-मुस्लिमांचा छळ केला जात आहे त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मोदी यांनी या प्रश्नावर प्रथमच भाष्य केले. येथे आयोजित एका कार्यक्रमात मोदी पुढे म्हणाले की, अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी भीती व्यक्त केली जात होती, मात्र निर्णय जाहीर झाल्यानंतर ही भीती निर्थक होती हे देशातील जनतेने सिद्ध केले.या वेळी मोदी यांनी अनुच्छेद ३७० चाही उल्लेख केला, राजकीयदृष्टय़ा हा निर्णय कठीण होता, मात्र त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या जनतेमध्ये विकासाची आशा पल्लवित झाली, असेही ते म्हणाले.

नागरिकत्व (सुधारणा) विधेयक सोमवारी संसदेत

नवी दिल्ली : बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात छळ होत असल्याने भारतामध्ये आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजांतील लोकांना बेकायदेशीर स्थलांतरित समजले जाणार नाही तर नागरिकत्व कायद्यातील प्रस्तावित सुधारणा अमलात आल्यानंतर या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. वादग्रस्त नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाविरुद्ध ईशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली असून ते येत्या सोमवारी संसदेत मांडले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 2:43 am

Web Title: pm narendra modi talk on indian citizenship in parliament zws 70
Next Stories
1 अमेरिकेच्या नौदल तळावर गोळीबार; हल्लेखोर ठार
2 लोकसभेत खडाजंगी, कामकाज तहकूब
3 उन्नाव बलात्कार पीडितेचा सफदरगंज रुग्णालयात मृत्यू
Just Now!
X