26 November 2020

News Flash

२६/११ सारख्या हल्ल्याच्या उद्देशाने आले होते चार दहशतवादी, मोदींनी घेतलं पाकिस्तानचं नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं सुरक्षा दलांचं कौतुक

जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठा हल्ला घडवण्याचे मनसुबे रचून भारतात आले होते असं म्हटलं आहे. आमच्या सुरक्षादलाच्या जवानांनी त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले असंही मोदींनी म्हटलं आहे.

पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याजवळ मोठ्या संख्येने असलेली शस्त्रास्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. हे सगळे पाहता हे चारही दहशतवादी हे दहशतवाद पसरवण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले आहे तसंच भारतीय लष्कराने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि सतर्कता दाखवत दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. जम्मू काश्मीरमधील लोकशाही प्रणालीला लक्ष्य करणारा हा कट होता असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी २६ नोव्हेंबरलाच पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात तयारीत होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना गुरुवारी पहाटे ४ वाजता चकमकीत ठार करत त्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:09 pm

Web Title: pm narendra modi targets pakistan on terrorism in the context of jammu kashmir nagrota encounter scj 81
Next Stories
1 उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरोधात योगी सरकारचा कडक कायदा येणार
2 ….तर तेजस्वी यादव यांनी देखील राजीनामा द्यावा; जदयूचा पलटवार
3 करोनाचा कहर… ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू
Just Now!
X