News Flash

विधेयकातील तरतुदी शेतक-यांच्या हिताच्या- पंतप्रधान

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भूसंपादन कायदा दुरुस्ती विधेयक आणण्यामागची केंद्र सरकारची भूमिका मांडली.

| March 22, 2015 02:58 am

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित करण्यात आलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भूसंपादन कायदा दुरुस्ती विधेयक आणण्यामागची केंद्र सरकारची भूमिका मांडली. विरोधकांचे आरोप फेटाळून लावत विधेयकातील तरतुदी शेतक-यांच्या हिताच्या असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
भूसंपादन कायदा हा १२० वर्षांपूर्वीचा असून कॉंग्रेस सरकारच्या काळातील या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही या कायद्यात काही दुरुस्ती सुचविल्या आहेत. भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये  गैरसमज पसरवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.  भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण व राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतक-यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे  असे मोदींनी स्पष्ट केले. नवीन विधेयकात भूसंपादनात शेतक-यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथे औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणा-यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतक-यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:58 am

Web Title: pm narendra modi to farmers lies being spread on land ordinance bill
Next Stories
1 संसद भवन परिसरातील आगीवर नियंत्रण
2 बीएमडब्ल्यु, फरारी आणि लॅम्बोर्गिनी ट्रॅफिकमध्ये फसतात तेव्हा…
3 उत्तरप्रदेशमध्ये रेल्वे अपघातात ३४ ठार
Just Now!
X