पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्ली-फरिदाबाद मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी एस्कॉर्ट्स मुजेसर स्टेशनपासून बाटा चौक पर्यत मेट्रोने प्रवास करत मेट्रो अधिका-यांशी संवाद साधला.


औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियानाला राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी मेट्रो मार्गाची सुरवात करण्यात आली आहे. दिल्लीतील बदरपूर पासून फरीदाबादमधील मुजेसर स्थानकापर्यत ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे. आयटीओ ते बदरपूरपर्यतच जाणारी मेट्रो आता फरीदाबाद ते मुजेसर स्टेशन म्हणजे १४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान नऊ स्थानके आहेत. याप्रकल्पासाठी तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यासंदर्भात पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.