News Flash

Coronavirus: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बैठकीला लावणार हजेरी

भारतात अद्यापही करोनाचा प्रसार कमी झालेला नाही. करोनावर कायमस्वरूपी उपाय म्हणून लसींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील करोनाची सद्यपरीस्थिती या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी असणार आहेत. बैठकीत सरकारकडून नजीकच्या भविष्यकाळात करोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी करोनावर तयार होणाऱ्या लसींच्या संशोधनाचा आणि विविध राज्यातील करोना परिस्थिती आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काही मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती. त्यानंतर आज सर्वपक्षीय बैठकीत अनेक नेते सहभागी होणार आहेत.

बैठकीत सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल, शिवसेनेचे विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद, बिजू जनता दलाचे चंद्रशेखर साहू, YSRCPकडून विजयसाई रेड्डी आणि मिथुन रेड्डी, MIMचे इम्तियाज जलील, JDUमधील आरसीपी सिंग, TMCचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ ब्रायन, AIADMKचे नवनीत कृष्णन, DMKचे टीआरके बाळू आणि तिरुची शिवा, JDSचे एचडी देवगौडा, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, बसपाकडून सतीश मिश्रा, राष्ट्रीय जनता दलमधून प्रेम चंद्र गुप्ता, TDPकडून जय गल्ला, आपचे संजय सिंग, TRSमधील नागेश्वर राव हे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीत करोनाचे ३,७३४ नवीन रुग्ण आढळले तर गेल्या २४ तासांत ८२ जणांचा मृत्यू झाला. करोनामुळे मृतांची संख्या ९,४२४ वर पोचली आहे. दिल्लीत सक्रीय रूग्णांची संख्या गुरुवारी ३०,३०२ वरून २९,१२० वर आली. भारतभरात करोनाग्रस्तांची एकूण रूग्णसंख्या ९५ लाखांच्या पार पोहोचली असून मृतांची संख्या १ लाख ४० हजारांच्या जवळपास आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 9:03 am

Web Title: pm narendra modi will lead the discussion of all party meeting today prevailing covid 19 situation ncp chief sharad pawar also joining vjb 91
Next Stories
1 … नाहीतर काही जण न बोलावता पाकिस्तानी बिर्याणी खाऊन येतात; काँग्रेस नेत्याची टीका
2 “आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय”; शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं जेवण
3 हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं; शिवसेनेचा निशाणा
Just Now!
X