26 September 2020

News Flash

लवकर बऱ्या व्हा ! शबाना आझमींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली प्रार्थना

कार अपघातात शबाना आझमी जखमी

“युवा वैज्ञानिकांनो पुढे या, करोनावर लास शोधा” (संग्रहित फोटो)

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली, कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. या अपघातानंतर आझमी यांना पनवेल जवळील MGM रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आझमी यांच्या अपघाताच्या बातमीची दखल घेतली असून, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींनी, लवकर बऱ्या व्हा! अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

शुक्रवारी (१७ जानेवारी) जावेद अख्तर यांनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमासाठी हे दोघे पुण्याच्या दिशेने निघाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 9:58 pm

Web Title: pm narendra modi wishes actress shabana aazmi to recover from accident psd 91
Next Stories
1 देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली काँग्रेस नेता हार्दिक पटेल अटकेत
2 J&K मध्ये १० जिल्ह्यात मोबाइल सेवा सुरू, सोशल मीडियावर बंदी कायम
3 अमेरिकेबद्दल बोलताना ‘जरा जपून शब्द वापरा’, ट्रम्प यांचा इराणच्या सुप्रीम नेत्याला इशारा
Just Now!
X